Buddha Purnima 2019: 502 वर्षांनंतर बुद्ध पौर्णिमा दिवशी जुळून आलाय 'हा' दुर्मिळ योग!
Vaishakh Purnima 2019 (Photo Credits: Pixabay)

Vaishakh Purnima 2019:  वैशाख महिन्यातील पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima) म्हणून साजरी केली जाते. यंदा 18 मे दिवशी 2019 बुद्ध पौर्णिमा भारतासह आशिया खंडात आणि जगभर साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मीय वैशाख पौर्णिमेचं व्रत करतात तर बौद्ध धर्मीय या दिवशी गौतम बुद्ध (Gautama Buddha) यांची जयंती म्हणून हा दिवस साजरा केला जाणार आहे.  यंदा या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सुमारे 502 वर्षांनंतर एक दुर्लभ योग जुळून येणार असल्याचं ज्योतिषशास्त्र सांगतं. यंदा बुद्ध पौर्णिमेदिवशी समसप्तक संयोग जुळून येत आहे.   Buddha Purnima 2019 Quotes: गौतम बुद्ध यांचे हे '5' प्रेरणादायी विचार बदलतील तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन!

समसप्तक राजयोग म्हणजे काय?

यंदा बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी समसप्तक राजयोग असल्याने बुद्ध पौर्णिमा अधिक खास बनली आहे. असा योग म्हणजे बृहस्पती (गुरू) आणि सूर्यदेव (सूर्य) एकमेकांसमोर येतात. असा योग 502 वर्षांपूर्वी 1517 साली आला होता आणि भविष्यात 2224 मध्ये तो पुन्हा येईल. Waterhole Census 2019: बुद्ध पौर्णिमा दिवशी प्राणी गणना का करतात? मुंबईसह महाराष्ट्रामध्ये वन्यजीव प्रेमींना ही संधी कुठे मिळते?

वैशाख पौर्णिमेदिवशी गंगा घाट ठिकाणी अनेक भाविक खास स्नानासाठी एकत्र येतात. पापमुक्ती मिळावी म्हणून हे स्नान केले जाते. गौतम बुद्ध हे भगवान विष्णूचे 9 वे अवतारअसल्याचं समजलं जातं. त्यामुळे यादिवशी विष्णूची देखील विशेष पूजा केली जाते.

टीप: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारीत आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.