Waterhole Census 2019: बुद्ध पौर्णिमा दिवशी प्राणी गणना का करतात? मुंबईसह महाराष्ट्रामध्ये वन्यजीव प्रेमींना ही संधी कुठे मिळते?
Machan Census (Photo Credits: Pixabay)

Machan Census 2019: बुद्ध पौर्णिमा म्हणजेच बुद्ध जयंतीचा  दिवस. वैशाख शुक्ल पौर्णिमेदिवशी बुद्ध पौर्णिमा भारत, नेपाळसह जगभरात साजरी केली जाते. भारतामध्ये बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी देशभरातील अभयारण्यांमधील प्राण्यांची गणना केली जाते. वन खात्यातील सरकारी कर्मचारी यांच्यासह वन्यजीव प्रेमींसाठी हा दिवस मोठा कुतूहलाचा असतो. मचाणवर बसून त्यांना जंगलातील प्राणी पाहण्याची संधी मिळते.  Buddha Purnima 2019 Quotes: गौतम बुद्ध यांचे हे '5' प्रेरणादायी विचार बदलतील तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन!

बुद्ध पौर्णिमेदिवशीच प्राण्यांची गणना का केली जाते.

वैशाख शुक्ल पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा ही उन्हाळ्याच्या दिवसातील सर्वाधिक प्रकाशमान रात्र असते. वैशाख महिन्यात उन्हाच्या झळ्या तीव्र असतात. त्यामुळे पाणवठ्यावर हमखास ते येतात. 24 तासामध्ये त्यांची गणना केली जाते. वनखाते अधिकारी दुपार पासूनच मचाणीवर बसतात. रात्री किमान एकदा प्राणी पाणवठ्यावर येतात.

वन्य प्रेमींनी प्राणी जवळून पाहण्याची ही संधी कुठे मिळते?

मुंबईच्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये मुंबईकर वन्य प्राणींसाठी ही संधी उपलब्ध करून दिली जाते. नागपूरच्या तडोबामध्ये ही पद्धत बंद करण्यात आली आहे. पण बफर झोनमधील प्राणी पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. पुण्यात भीमांशकर अभयारण्य, सुपे येथील मयुरेश्वर अभयारण्यात ही गणना केली जाते. पेंच अभयारण्य, भोर, पैनगंगा, तिपेश्वर आदी अभयारण्यांमध्ये सुमारे 1000 ते 1500 रूपये सशुल्क ही संधी उपलब्ध करून दिली जाते.

बुद्ध पौर्णिमेदिवशी वन्य जीव पहायचे असतील तर अनेक ठिकाणी तुम्हांला आगाऊ नोंदणी करणं आवश्यक आहे. तसेच वन्य प्राण्यांना त्रास होणार नाही यासाठी असलेल्या कठोर नियमांचे पालन करणंदेखील आवश्यक आहे.