Bhaubij Special Marathi Songs: बहीण भावाच्या नात्याची महती सांगणारी मराठीतील सदाबहार गीते (Watch Video)
भाऊबीज 2019 (संग्रहित, संपादित प्रतिमा)

Bhaubij Special Marathi Songs: आज संपूर्ण देशभरात दिवाळी सण उत्साहात साजरा होत आहे. हिंदू संस्कृतीमध्ये वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या दिवसाला विशेष महत्त्व आहे. भाऊ-बहिणीच्या नात्याची महती सांगणारा सण अशी भाऊबीज सणाची ओळख आहे. या दिवशी बहिण भावाचे औक्षण करत असते. तसेच भाऊ आपल्या लाडक्या बहिणीला भेटवस्तू देत असतो. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये बहीण-भावाच्या नात्याचा अविष्कार दाखवणारे अनेक चित्रपट आहेत. या चित्रपटात बहिण-भावाच्या नात्यावर आधारित अनेक गीतांची निर्मिती करण्यात आली आहे. दिवाळी संपल्यानंतर लगेचचं दोन दिवसांत भाऊबीजेचा दिवस येतो. यंदा 29 ऑक्टोबरला भाऊबीजेचा सण साजरा केला जाणार आहे. तुम्हाला हा दिवस अधिक स्पेशल बनवायचा असेल तर तुम्ही बहिण-भावाच्या नात्यावर आधारित गिते ऐकून तो अविस्मरणीय बनवू शकता.

पाहा व्हिडिओ - 

भावासाठी धावा करते - 

माहेरची साडी या चित्रपटातील हे एक अतिशय गाजलेले गीत. अभिनेत्री अलका कुबल आणि अभिनेता अजिंक्य देव यांच्यावर हे गीत चित्रीत झाले आहे. अनिल मोहिले यांनी या गीताला संगीत दिले आहे. बहीण भावाच्या प्रेमातील अर्तता या गाण्यातून व्यक्त होते.

सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योति -

'भाऊबीज' सिनेमातील हे गाणं. गीत कवी संजिव यांचं. स्वर आशा भोसले आणि गीताला संगीत दिले आहे वसंत मोहिते यांनी. गेली अनेक वर्षे हे गीत मराठी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करुन आहे.

सतू धरमाचा भाऊ - 

'वारणेचा वाघ' या चित्रपटातील हे गीत गायलंय आशा पागधरे यांनी. या गिताला उषा मंगशकर यांनी कोरस दिला आहे. केवळ ग्रामिण महाराष्ट्रच नव्हे तर, शहरातील प्रेक्षकांनीही हा चित्रपट अक्षरश: डोक्यावर घेतला होता. या गाण्यातूनही बहीण भावाच्या प्रेमाची व्याकूळता डोकावते.

भाऊबीजेला 'यमद्वितीया' असे सुद्धा म्हटले जाते. त्यामागे एक कथा आहे. ती अशी की या दिवशी यमाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे, अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजनाचा आस्वाद घेतला. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात, म्हणजे तसे करणाऱ्याला त्यावर्षी यमापासून भय नसते. तसेच यम आणि यमुना या भाव बहिणीच्या जोडगोळीबद्दल अशी कथा आहे की ज्या दिवशी यम वारला त्या वेळी यमीला इतके दुःख झाले की ती आपले रडणे थांबवू शकत नव्हती. तेव्हा शेवटी दिवस संपला हे सूचित करण्यासाठी परमेश्वराने रात्रीची निर्मिती केली आणि यमुनेचे भावाबद्दलचे दुःख काहीसे हलके होऊन तेव्हापासून भाऊबीजेची प्रथा पडली. आपल्या भावाचे आयुष्य वाढावे म्हणून बहिणीने या दिवशी यमाची पूजा आणि प्रार्थना करावयाची असते.