Ashadi Ekadashi Messages in Marathi: आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी म्हटले जाते. या व्यतिरिक्त या एकादशीला देवशयनी एकादशी, हरिशयनी एकादशी आणि पद्मनाभा एकादशी नावाने सुद्धा ओळखले जाते. पौराणिक मान्यतेनुसार, या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णु याांचा शयन काळासा प्रारंभ होतो. या चार महिन्यांच्या दिवसात ते समुद्रात नीद्रा करतात. आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशीपासून चातुर्मासाला आरंभ होते. याच दरम्यान, विवाह, मुंडन आणि गृह प्रवेश सारखी शुभ कार्ये केली जात नाहीत. आषाढी एकादशीच्या चार महिन्यानंतर देवउठनी किंवा प्रबोधिनी एकादशी दिवशी भगवान विष्णू नीद्रेतून जागे होतात. त्यानंतर सर्व शुभ कार्ये करण्याचा काळ सुरु होतो.
आषाढी एकादशीचा उत्सव येत्या 21 जुलै रोजी साजरा केला जाणार आहे. मात्र यंदाच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे आषाढी एकादशीचा सण अत्यंत साधेपणाने साजरा करावा असे सांगण्यात आले आहे. तर आषाढी एकादशी निमित्त मराठी मेसेज, Quotes, WhatsApp Status, Wishes, HD Photos पाठवून साजरा करा विठुरायाचा दिवस.(25 जुलैपासून सुरु होणार सावन महिना, या महिन्यातील शिवरात्रि आणि सोमवारचे महत्व जाणून घ्या)
>>जेथे जातो तेथे
तू माझा सांगाती
चालविसी होती धरुनिया
चालो वाटो आम्ही तुझाचि आधार
चालविसी भारसवे माझा
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
>>काया ही पंढरी
आत्मा हा विठ्ठल
नांदतो केवल पांडुरंग
जय जय हरी विठ्ठल
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
>>आम्हां नादी विठ्ठलु
आम्हां छंदी विठ्ठलु
हृदयपरी विठ्ठल मिळतसे
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
>>विठ्ठल जीवाचा जिव्हाळा
विठ्ठ्ल कृपेटा कोवळा
विठ्ठल प्रेमाचा पुतळा
लावियेले चाळा
विश्व विठ्ठलें
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
>>जरी बाप साऱ्या जगाचा परि तू
आम्हा लेकरांची विठू माउली
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू नीद्रेतून जागे होण्यापूर्वी त्यांची पूर्ण विधींसह पूजा केली जाते. या दिवशी उपवास ठेवून भगवान विष्णू यांची षोडशोपचार पूजा करावी. त्यांना पिवळ्या रंगाची वस्रे, पिवळे चंदन आणि पिवळी मिठाईसह फळांचा नैवेद्य दाखवावा. त्यांच्या पूजनावेळी तुळची पानांचा जरुर वापर करा. नाहीतर पूजेचे पूर्ण फळ मिळणार नाही. या दिवशी रात्री भगवान विष्णू यांचे भजन करावे. तर दुसऱ्या दिवशी सुर्योदयानंतर ब्राम्हणांना भोजनासाठी बोलवावे.