25 जुलैपासून सुरु होणार सावन महिना, या महिन्यातील शिवरात्रि आणि सोमवारचे महत्व जाणून घ्या
भगवान शिव (Photo Credits: Pixabay)

Shravan Maas 2021:  हिंदू धर्मात सावन महिन्याला विशेष महत्त्व दिले जाते. यावर्षी हा पवित्र महिना 25 जुलैपासून म्हणजे रविवारपासून सुरू होत आहे. त्यानुसार (उत्तर भारत) सावन चा पहिला सोमवार 26 जुलै रोजी आहे. सावन महिना 22 ऑगस्ट पर्यंत असेल. अशाप्रकारे, या महिन्यात चार सोमवार असतील आणि चारही सोमवारी भगवान शिव यांची विशेष पूजा आणि विधी करण्याचा नियम आहे. सोमवारी हा दिवस भगवान शंकराला समर्पित असल्याने सावन त येणारा प्रत्येक सोमवार हा पवित्र दिवस मानला जातो.या दिवशी विवाहित महिला आपल्या वैवाहिक जीवनाचे रक्षण आणि आरोग्यासाठी भगवान शिवच्या नावाने उपवास ठेवतात आणि त्यांच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात. चला या दिवसाचे महत्त्व, विधी आणि शुभ काळ जाणून घेऊया. (Shravan Month 2021 Date: श्रावणातला पहिला सोमवार उपवास कधी कराल? जाणून घ्या या महिन्याचे महत्व )

श्रावण महिन्यात येणारे सोमवार

26 जुलै रोजी प्रथम सावन सोमवार

02 ऑगस्ट रोजी दुसरा सावन सोमवार

9 ऑगस्ट रोजी तिसरा सावन सोमवार

16 ऑगस्ट रोजी सावन सोमवार

सावन महिन्याचे महत्व

श्रावण महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या महिन्यात शिव पूजा केल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या महिन्यात सोमवारी उपवास केल्याने लगेच त्याचे फळ मिळते. या महिन्यात शिवपूजा केल्याने वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्या दूर होतात. श्रावणमधील शिवपूजनामुळे सर्व प्रकारचे दु: ख संपते. शिवपूजा केल्याने आपली सर्व पापे नष्ट होतात आणि मरणानंतर मोक्ष प्राप्त होतो.

सावन महिन्यातील शिवरात्रि कधी आहे?

हिंदू कॅलेंडरमध्ये, प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला शिवरात्र येते , काही ठिकाणी त्याला श्रावणी शिवरात्रि देखील म्हटले जाते. या महिन्यातील शिवरात्रीला विशेष महत्त्व दिले जाते. या दिवशी व्रत करून भगवान शिव यांची पूजा केल्यास सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात आणि जीवनात आनंद आणि भरभराट होते. असे मानले जाते की, भगवान शिव चातुर्मासात पृथ्वीवर भेट देतात आणि आपल्या भक्तांचे सर्व त्रास दूर करतात. या महिन्यात शिवरात्रि 6 ऑगस्टला येत आहे, ज्याचे पारायण शनिवारी 7 ऑगस्टला केले जाईल.

सावन महिन्यात शिवरात्रीची पूजा करण्याची पद्धत

चतुर्दशी तिथीला सकाळी सूर्योदयाच्या आधी उठा, स्नान करा आणि ध्यान करा. स्वच्छ वस्त्र परिधान करा आणि व्रत ठेवा आणि भगवान शिव यांची उपासना करा. घरातील मंदिरात भगवान शिवची मूर्ती किंवा छायाचित्र स्वच्छ केल्यानंतर त्यांच्यावर गंगाजल शिंपडा. आता शिव समोर धूप-दीप प्रज्वलित करुन भगवान शंकराची प्रार्थना करा. मंत्र पठण करताना भगवान शंकरांना 1001 बेल पत्र द्या. त्यानंतर पाणी, दूध, इत्र, दही देऊन रुद्राभिषेक करा. धतूरा, भांग, गूळ, पुवा, सांजा, कच्चे चणे, दुधाच्या मिठाई इत्यादी शिवलिंगावर अर्पण करा.

शिवदेवाचा मंत्र

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।

उर्वारुकमिव बन्धनान मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥

ॐ तत्पुरुषाय विदमहे, महादेवाय धीमहि तन्नो रुद्र: प्रचोदयात्।।

ॐ हौं जूं स: ॐ भूर्भुव: स्व: ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवद्र्धनम्

सावन शिवरात्र ऑगस्ट (शुक्रवार) रोजी पूजेसाठी शुभ वेळ

निशिता काळ पूजा मुहूर्ता: 7 ऑगस्ट (शनिवार) 2021,

सकाळी 12.06 ते 12.48

पारण मुहूर्त:  7 ऑगस्ट रोजी सकाळी 05.46 ते दुपारी 03.45

सावन मधील कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी

चतुर्दशीला प्रारंभः 06 ऑगस्ट 2021, शुक्रवारी संध्याकाळी 06.28 पासून

चतुर्दशी संपेलः 07 ऑगस्ट 2021 रोजी शनिवारी रात्री 07.11 वा