Ashadhi Ekadashi 2019: 'आषाढी एकादशी' ला देवशयनी एकादशी का म्हणतात? जाणून घ्या या दिवसाचे महत्व
भगवान विष्णु (Photo Credits: Facebook)

Devshayani Ekadashi 2019 Muhurt: आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. वारकरी सांप्रदायातील भाविक महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपुरी (Pandharpur)पायी चालत येतात. चंद्रभागेत (Chandrabhaga) स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. पौराणिक कथांमध्ये अनेक ठिकाणी या एकादशीला देवशयनी एकादशी (Devshayani Ekadashi) असेही म्हंटले जाते, या दिवसांनंतर देव चार महिन्यांसाठी झोपी जातात असा विश्वास यामागे आहे, यंदा हा आषाढी एकादशीचा पवित्र सोहळा शुक्रवारी, 12 जुलै रोजी असणार आहे. चला तर मग ,याच निमित्ताने जाणून घेऊयात आषाढी म्हणजेच देवशयनी एकादशी विषयी काही खास गोष्टी..

देवशयनी एकादशी असे नाव का पडले?

मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. आषाढ महिन्यात येणार्‍या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते; म्हणून आषाढी एकादशीला `देवशयनी' (देवांच्या निद्रेची) एकादशी', असे म्हणतात.यानंतर चार महिने, म्हणजेच आषाढाचे 20 दिवस, श्रावण-भाद्रपद-आश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवस देव झोपी जातात.

या चार महिन्याच्या झोपेत ठीक दोनमहिन्यांनी ते कुशीवर वळतात म्हणून भाद्रपदातील एकादशीला 'परिवर्तनी एकादशी' असे म्हणतात. चार महिन्यानंतर त्यांना जाग येणार म्हणून कार्तिकी एकादशीला 'प्रबोधिनी एकादशी' असे म्हणतात. पंढरपूर: आषाढी एकादशी 2019 च्या पार्श्वभूमीवर विठ्ठल- रुक्मिणीच्या मंदिरामध्ये बदल; मुखदर्शन होणार सुकर

देवशयनी काळात काय कराल?

आजपासून वर्षातील सणांचा चार महिन्याचा एक कालखंड सुरू होतो ज्याला चातुर्मास असे म्हणतात. देव झोपले असल्यामुळे या काळात असुरी शक्ती प्रबळ होतात आणि माणसाला त्रास देऊ लागतात. असुरांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी या दरम्यान व्रत, पूजा, आचरण केले जातात.पावसाळा असल्यामुळे स्थलांतर शक्य नसते त्यामुळे चातुर्मास व्रत एका स्थानी राहूनच करण्याची पद्धत प्रचलित आहे.पुराणानुसार देवशयनी एकादशी या काळात सत्कर्म करणे, सत्कथा ऐकणे, सत्पुरुषांची सेवा, संत दर्शन, दानधर्म इत्यादी गोष्टी चातुर्मासात अत्यंत महत्त्व आहे. Ashadhi Ekadashi 2019 Messages: आषाढी एकादशी निमित्त हे खास संदेश, शुभेच्छापत्रं, Facebook आणि WhatsApp Messages च्या माध्यमातून शेअर करुन साजरा करा विठुरायाचा उत्सव!

मात्र या काळात हिंदू धर्मात वर्णित संस्कारांपैकी यज्ञोपवीत संस्कार, विवाह, दीक्षा ग्रहण, यज्ञ, गृहप्रवेश, गोदान इत्यादी शुभ कर्म केली जात नाहीत.तसेच चातुर्मासात विवाह मुहूर्त नसतात.

आषाढी एकादशी तिथी प्रारंभ: 12 जुलै मध्यरात्री 01:03 वाजता

आषाढी एकादशी तिथी समाप्ती :13 जुलै मध्यरात्री 00:31वाजता

आषाढी वारीच्या दिवशी आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहू येथून तुकारामांची, त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, तर उत्तर भारतातून कबिराची पालखी पंढरपुरी येते. यामध्ये सहभागी झालेल्या लाखो भाविकांना दर्शन दिल्यावर देव चार महिने झोपी जाणार आहेत.