![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/07/teaser-2-380x214.jpg)
Ashadhi Ekadashi 2019: येत्या काही दिवसांत महाराष्ट्राचे आभूषण असणारी आषाढी वारी संपन्न होणार आहे आणि तो दिवस म्हणजे आषाढी एकादशीचा. यंदा 12 जुलै, शुक्रवारी आषाढी एकादशी आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रखुमाईच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून वारकरी एकत्र येतील. विठ्ठलनामाचा एकच जयघोष करतील.
या पवित्र सणाच्या शुभेच्छा आपल्या आप्तेष्टांना देण्यासाठी खास संदेश, शुभेच्छापत्रं. तुम्ही हे संदेश Facebook आणि WhatsApp Messages च्या माध्यमातून शेअर करुन विठुरायाचा हा उत्सव खास करु शकता. 'आषाढी एकादशी' ला देवशयनी एकादशी का म्हणतात? जाणून घ्या या दिवसाचे महत्व
बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय
श्री ज्ञानेश्वर महाराज की जय, श्री तुकाराम महाराज की जय|
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!
![1](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/07/1-4.jpg)
जय जय विठ्ठल |
जय हरी विठ्ठल ||
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
![2](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/07/2-3.jpg)
तीर्थ विठ्ठल ...क्षेत्र विठ्ठल
आषाढी एकादशी च्या मंगलमय शुभेच्छा!
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/07/vithal.jpg)
जय पांडुरंग हरी..
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
![4](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/07/4-3.jpg)
हरि ओम विठ्ठल
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
![5](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/07/5-2.jpg)
विष्णू देवतचे व्रत असलेल्या या आषाढी एकादशीला 'शयनी एकादशी' असेही म्हटले जाते. या दिवसापासून चातुर्मासास प्रारंभ होतो. त्यानंतर चार महिन्यांनी म्हणजे कार्तिकी एकादशी दिवशी चातुर्मास संपन्न होतो.