Annabhau Sathe Jayanti 2020: 'फकिरा' कादंबरीमुळे रशिया मध्येही झाले होते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कौतुक; जाणून घया त्यांच्याबद्दल खास गोष्टी!
Annabhau Sathe (Photo Credits: Wikimedia Commons)

आज 1 ऑगस्ट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe)  यांचा जन्मदिवस. आज अण्णाभाऊ साठे यांच्या जन्म शताब्दी वर्षाची सांगता होणार आहे. लोकशाहीर, लोककलावंत अण्णा भाऊ साठे हे नाव महाराष्ट्राला सुपरिचित आहे. 'फकिरा' ही कादंबरी असो किंवा ' माझी मैना गावाकडं राहिली... ' सारखी लावणी त्यांनी कायमच त्यांच्या साहित्यामधून अन्यायाविरूद्ध लढण्यासाठी समाजाला प्रेरणा दिली आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात आले. आज त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगता दिनी जाणून घेऊन या मराठमोळ्या लोककलावंताबद्दल काही खास गोष्टी.

अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल खास गोष्टी

  • अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 साली सांगलीमध्ये वाटेगाव येथे मातंग समाजातील एका सामान्य घरामध्ये झाला.
  • इंग्रंजाविरुद्धच्या गुलामगिरीच्या विरूद्धच्या भारतीयांच्या लढ्यामध्ये क्रांतिकाराकांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सांगली जिल्ह्यामध्ये अण्णाभाऊ साठे देखील जोडले गेले.
  • स्वातंत्र्यलढ्यापासून ते अगदी गोवा मुक्ती चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची कामगिरी मोलाची ठरली. त्यांच्या पोवाड्यांनी अनेकांना स्फुर्ती मिळत असे. अण्णाभाऊ साठे यांचे प्रेरणादायी विचार जे आजच्या समाज व्यवस्थेवरही करतात प्रहार
  • अण्णाभाऊ साठे केवळ शाहीर नव्हते तर त्यांनी समाजातील शोषितांच्या व्यथा मांडणार्‍या अनेक साहित्य प्रकरांची निर्मिती केली. यामध्ये 21 कथासंग्रह, 30 पेक्षा अधिक कादंबर्‍या, 13 लोकनाटकं, 3 नाटकं, पंधरा पोवाडे, एक प्रवासवर्णन असे साहित्य प्रकार हाताळले आहेत.
  • फकिरा ही अण्णाभाऊंची साहित्यकृती विशेष गाजली. ‘फकिरा’मध्ये दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना, दलितांना वाटप करणाऱ्या फकिरा या मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण आहे.
  • फकिरा कादंबरी केवळ महराष्ट्रामध्ये नव्हे तर देशा-परदेशामध्ये गाजली. त्यांची भाषांतरं करण्यात आली. दरम्यान फकिरा कादंबरीला 1961 साली महाराष्ट्र राज्य सरकारचा पुरस्कार देखील मिळाला. त्यानंतर परदेशात रशिया मध्येही त्याचा गौरव झाला.

दरम्यान अण्णाभाऊ साठे यांनी कायमच आपल्या कलागुणांच्या माध्यमातून,साहित्यमधून स्वातंत्र्य, समता, न्याय या तत्त्त्वांचा पुरस्कार केला आहे. उपेक्षित वर्गाचा संघर्ष त्यांनी सार्‍यांसमोर ठेवला.