अंगारकी संकष्टी चतुर्थीचा (Angarki Sankashti Chaturthi) दिवस गणेशभक्तांसाठी अत्यंत मंगलमय दिवसांपैकी एक आहे. बाप्पाची आराधना करणारे अनेक भाविक हमखास अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी व्रत करतात. आजच्या दिवशी बाप्पा सोबतच चंद्राची देखील पूजा करण्याची प्रथा असल्याने या व्रताची सांगता रात्री चंद्रोदयाची वेळ पाहून केली जाते. चंद्रोदयाच्या वेळेस बाप्पा सोबतच चंद्र दर्शन घेऊन मग दिवसभराचा उपवास संपवला जातो. मग आजच्या दिवशी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर सह गोवा आणि बेळगावामध्येही नेमका चंद्रोदय किती वाजता होणार आहे? हे जाणून घेत तुम्ही या व्रताची सांगता करू शकाल.
अंगारकी चतुर्थी या शब्दाची फोड केली तर संस्कृतमध्ये अंगारक म्हणजे जळत्या कोळशाच्या अंगारासारखा लाल आणि मंगळ ग्रहाचा संदर्भ आहे (ज्याला मंगळवार (मंगलवार) हे नाव देण्यात आले आहे). अंगारकी चतुर्थीला भक्ताने प्रार्थना केल्यास आपल्या मनोकामना पूर्ण होतील असा विश्वास आहे. हे व्रत केल्यास आयुष्यातील अडचणी कमी होतात कारण भगवान गणेश हे सर्व अडथळे दूर करणारा आणि बुद्धीचा सर्वोच्च स्वामी आहे. त्यामुळे आयुष्यातील दु:ख, अडचणी कमी करण्यासाठी अनेकजण हमखास अंगारकीचा उपवास करतात. नक्की वाचा: Angarki Sankashti Chaturthi 2024 Wishes in Marathi: अंगारकी संकष्ट चतुर्थी दिवशी WhatsApp Status, Facebook Messages शेअर करून प्रियजणांना द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!
आज अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी पहा चंद्रोदयाच्या वेळा काय?
मुंबई - 22.28
पुणे - 22.23
नाशिक - 22.26
नागपूर - 22.05
गोवा- 22.19
रत्नागिरी- 22.23
बेळगाव- 22.17
अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी बाप्पाला नैवेद्य म्हणून मोदक दाखवले जातात. यामध्ये उकडीच्या मोदकाला अधिक पसंती असते. तर पूजेमध्येही बाप्पाला प्रिय दुर्वा, जास्वंदाची फुलं अर्पण केली जातात. चंद्रोदयानंतर बाप्पाची आरती केली जाते त्याला नैवेद्य दाखवून मग व्रताची सांगता केली जाते. या वेळी सात्विक जेवणाचा आस्वाद घेतला जातो.
(टीप: सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आला असून लेटेस्टली मराठी कोणत्याही गोष्टीची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)