
गणेशभक्तांसाठी आजचा दिवस अधिकच खास आहे. दर महिन्यात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत करून बाप्पाला प्रसन्न केले जाते. मात्र चंद्रोदयाच्यावेळी कृष्ण चतुर्थी असेल तर तो दिवस संकष्ट चतुर्थीचा मानला जातो. संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली की तिला 'अंगारकी संकष्ट चतुर्थी ' (Angarki Sankashti Chaturthi) म्हणतात. आज 25 जून चा दिवस अंगारकी संकष्टीचा दिवस आहे. त्यामुळे बाप्पाच्या दर्शनाला मंदिरामध्ये मोठी गर्दी बघायला मिळेल. दरम्यान तुमच्या गणेशभक्त मित्र मंडळींना, नातेवाईकांना, आप्तेष्टांना या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा देत आजच्या दिवसाची सुरूवात खास करा.
गणपतीला दु:खहर्ता आणि सुखकर्ता म्हणून पाहिलं जात असल्याने अंगारकी संकष्टी दिवशी व्रत केल्याने आयुष्यातील अडी-अडचणी, दु:ख दूर होतात आणि मनोकामाना पूर्ण होतात अशी धारणा आहे. त्यामुळे दर महिन्याला येणार्या संकष्टीला व्रत न करता केवळ अंगारकीला देखील व्रत करून दु:खांचा नाश होतो अशी भावना आहे. Angarki Sankashti Chaturthi 2024 Moon Rise Timings: अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी व्रताची सांगता करण्यासाठी जाणून घ्या चंद्रोदयाच्या वेळा!
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा





प्रत्येक महिन्याच्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी 'संकष्ट गणपती पूजा' केली जाते. यावेळी बाप्पाला हार, जास्वंदाची फुलं, दुर्वा अर्पण केल्या जातात. सोबतच बाप्पाच्या आवडीचा मोदकांचा प्रसाद नैवेद्य म्हणून दाखवण्याची पद्धत आहे. विविध प्रांतानुसार आणि आवडीनुसार तळणीचे, उकडीचे मोदक केले जातात.