Amrita Pritam's 100th Birthday Google Doodle: नल-दमयंती, हिर रांजा, रोमिओ-ज्युलिएट यांसारख्या प्रेमी जोड्या आता एक दंतकथा बनून राहिल्या आहेत. जगप्रसिद्ध अशा प्रेमी युगुलांच्या जोड्यांची यादी पूर्ण करायची तर, अलिकडील काळातील नाव अमृता प्रीतम (Amrita Pritam) यांच्या नावाशिाय ती पूर्णच होणार नाही. आपले शब्द कवीतेच्या माध्यमातून कागदावर उतरवणारी आणि असंख्य वाचक, रसिक आणि चाहत्यांच्या हृदयापर्यंत पोहचवणारी कवयत्री अशी अमृता प्रीतम यांची खास ओळख. त्यांची लेखणी आणि प्रेम या दोन्हीची लोकप्रियता विचारात घेऊन इंटरनेट विश्वातील सर्वात मोठे सर्च इंजिन गूगलनेही अमृता प्रीतम यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. Doodle च्या माध्यमातून Google ने अमृता प्रीतम यांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे आज (31 ऑगस्ट 2019) अमृता प्रीतम यांचा 100वा स्मृतिदिन आहे. त्यामुळे अमृता प्रितम जन्मशताब्दी वर्ष हे खास औचीत्य साधत Google Doodle साकारण्यात आले आहे.
पंजाबी भाषेतील लोकप्रिय लेखकांमध्ये अमृता प्रितम यांचे नाव सर्वात अग्रक्रमांकावर येते. पंजाबी भाषेतील पहिली कवयत्री असा बहुमानही अमृता प्रीतम यांच्या नावावर आहे. आजच्या Google Doodle मध्ये अमृता प्रीतम यांचे एक चित्र आपणास पाहायला मिळते. ज्यात त्या काही लिहिताना दिसतात. आजज्या Google Doodle वर क्लिक करताच गूगलच्या माध्यमातून अमृता प्रीतम यांच्याविषयी माहिती देणाऱ्या लिंकचे शेकडो दुवे पाहायला मिळतात.
अमृता प्रीतम यांचा जन्म 1919 मध्ये गुजरांवाला पंजाब येथे झाला. त्यांचे बालपण आणि प्राथमिक शिक्षण हे लाहोर येथ झाले. त्यांना बालपणापासूनच कवितांची आवड होती. त्या केवळ कविताच नव्हे तर, कथा आणि लेखही लिहीत असत. लिखाण हा जणू त्यांचा आत्मा होता. 'पांच बरस लंबी सड़क', 'पिंजर', 'अदालत', 'कोरे कागज', 'उन्चास दिन', 'सागर और सीपियां' यांसारख्या बहारदार कादंबऱ्यांनी वाचकांना भारुन टाकले.
त्यांच्या लेखणीतील ताकद पाहून मोठमोठे साहित्यिक आणि रसिक वाचक त्यांचे कौतुक करत. अमृता प्रीतम यांना साहित्य सेवेसाठी अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. 1957 मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार, 1958 मध्ये पंजाब सरकारद्वरा देण्यात येणारा भाषा विभाग पुरस्कार, 1988 मध्ये आंतरराष्ट्रीय किर्तीचा बल्गारिया वैरोव पुरस्कार आणि 1982 मध्ये भारताचा सर्वोच्च समजला जाणारा 'ज्ञानपीठ' पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. (हेही वाचा, मुथुलक्ष्मी रेड्डी: भारतातील पहिल्या महिला आमदार; ज्यांच्या सन्मानार्थ बनले आजचे Google Doodle)
दरम्यान, अमृता प्रीतम - साहिर लुधियानवी आणि चित्रकार इमरोज हा प्रेमाचा त्रिकोण आजही अनेकांच्या कौतुकाचा चर्चेचा आणि अभ्यासाचा विषय ठरला आहे. तिघेही आपापल्या ठिकाणी उच्च कोटीचे प्रतिभावंत होते. सुरुवातीला अमृता प्रीतम आणि साहिर लुधियानवी यांच्यात निर्माण झालेले प्रेम आणि त्यात आलेला चित्रकार इमरोज नावाचा आलेला एक वेगळा कोण. त्यातून निर्माण झालेला प्रेमाचा त्रिकोण हे सगळेच काही और होते. इतक्या अल्प शब्दांत त्यांची प्रेमक कहाणी लिहिणे केवळ कठीणच नव्हे तर अशक्य आहे. अमृता प्रीतम यांच्या 100व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना शतश: प्रणाम.