मुथुलक्ष्मी रेड्डी: भारतातील पहिल्या महिला आमदार; ज्यांच्या सन्मानार्थ बनले आजचे Google Doodle
Google Doodle Celebrates 133rd birthday of Muthulakshmi Reddi (Photo credits: Google)

मुथुलक्ष्मी रेड्डी 133 वी जयंती Google Doodle:  मुथुलक्ष्मी रेड्डी, नाव आपल्यापैकी बहुतेकांना परिचीत असेल, काहींना माहितीही नसेल. पण, इंटरनेट विश्वातील सर्वात मोठे सर्च इंजिन Google च्या पेजवर आज Doodle रुपात मुथुलक्ष्मी रेड्डी यांची प्रतिमा झळकली आणि आज पुन्हा एकदा त्यांचे अवघ्या भारताला स्मरण झाले. डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी ( Muthulakshmi Reddi)  म्हणजे भारतातील पहिल्या महिला आमदार (India's First Woman Legislator) . संसदीय मार्गाने राजकारणात खऱ्या अर्थाने निवडणूक जिंकून राजकारणात आलेल्या त्या पहिल्या भारतीय महिला. अशा डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी यांची आज 133 वी जयंती. त्यांच्या जयंतीनिमीत्त आज गुगलने डूडल बनवून त्यांचा सन्मान केला आहे.

केवळ भारतातील पहिली महिला आमदार इतकीच डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी यांची ओळख नाही. तर, लिंगभेदावर अधारीत समाजव्यवस्थेविरुद्ध लढा, सामाजिक विषमता आणि आधुनिक विचारांच्या समाजसुधारक म्हणूनही त्यांना ओळखले जाते. मुथुलक्ष्मी रेड्डी या तामिळनाडू रज्यातील सरकारी रुग्णालयात एक शल्यचिकित्सक म्हणूनही काम करणाऱ्या पहिला महिला ठरल्या. पहिल्या महिला आमदार (लॉ मेकर) आणि सर्जन (शल्यचिकित्सक), समाजसुधारक असलेल्या अशा मुथुलक्ष्मी रेड्डी यांच्या कार्याची दखल घेऊनच गुगलने त्यांना गुगल डूडल बनवून श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुथुलक्ष्मी रेड्डी यांचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजेच (30 जुलै) रोजी तामिळनाडू येथे झाला. सरकारी रुग्णालयात शल्यचिकित्सक ठरलेल्या त्या पहिल्या भारतीय महिला होत. सुरुवातीपासूनच डॉ. रेड्डी या लढावू वृत्तीच्या होत्या. त्यांच्या लढाईची सुरुवातच मुळी घरातून झाली. त्या काळात अत्यंत कमी वयात मुलींची लग्न केली जात. त्यामुळे डॉ. रेड्डी यांच्या घरातूनही त्यांच्या विवाहाबाबत जोरदार चर्चा सुरु झाली. मात्र या चर्चेला मुथुलक्ष्मी रेड्डी यांनी ठाम विरोध दर्शवला. आपण आपले शिक्षण पूर्ण करु आणि त्यानंतरच लग्न करु असा थेट विचार त्यांनी आपल्या कुटुंबीयांना ठामपणे सांगितला.

मुथुलक्ष्मी रेड्डी यांनी पुढे मद्रास मेडिकल कॉलेजमधून डिस्टिंक्शन मिळवत पदवी प्राप्त केली. पुढे मुथुलक्ष्मी रेड्डी यांनी आपले वैद्यकीय व्यवसायातील कार्य थांबवले आणि राजकारणात येऊन त्यांनी मद्रास विधान परिषदेत प्रवेश मिळवला. या काळात त्यांनी मुलींच्या विवाहाचे वय वाढविण्यासाठी तसेच, त्यांच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवला. (हेही वाचा, महिला वर्ल्ड कप 2019- दिवस 25 Google Doodle: FIFA Women's World Cup मधील आज होणाऱ्या अंतिम सामन्यानिमित्त गुगुलचे खास डुडल)

मुथुलक्ष्मी रेड्डी यांनी 1914 मध्ये सुंदरा रेड्डी नामाक एका डॉक्टरसोबत विवाह केला. डॉ. सुंदरा रेड्डी यांच्यासोबत त्यांचे सूर चांगलेच जुळले. आपल्या पतींना सोबत घेऊन त्यांनी समाजातील अनिष्ट रुढी परंपरांबद्दल लढा सुरुच ठेवला. त्यांनी कर्करोगावर उपचार करणारे रुग्णालयही सुरु केले. त्यांचे कार्य पाहून भारत सरकारने 1956 या वर्षी पद्म भूषण हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन सन्मानित केले.