
Bhim Jayanti 2024: भीम अनुयायींसाठी 14 एप्रिल हा दिवस खास असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. B R Ambedkar) यांचा जन्म दिवस असल्याने या दिवशी आंबेडकर अनुयायी आवर्जून त्यांच्या प्रति आपला आदरभाव व्यक्त करतात. देशभर 14 एप्रिल या दिवशी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आंबेडकरांनी हालाखीच्या परिस्थिती वर मात करून शिक्षण पूर्ण केले. परदेशात शिक्षण घेऊन भारतामध्ये परतल्यानंतर त्यांनी दलित समाजासाठी आपलं आयुष्य वेचलं. त्यांना समाजात सन्माजनक वागणूक मिळावी यासाठी त्यांनी मोठा लढा पुकारला. मग अशा या महामानवाला त्याच्या जन्मदिनी शुभेच्छा देत आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठमोळ्या शुभेच्छा, Greetings, WhatsApp Status, Facebook Messages शेअर करत हा दिवस साजरा करायला विसरू नका.
आंबेडकरांनी हिंदू धर्मात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. हिंदू धर्मात राहून अस्पृश्यांची आर्थिक स्थिती व सामाजिक दर्जा सुधारणार नाही, याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरांच्या घोषणेनंतर २१ वर्षे जगातील विविध प्रमुख धर्मांचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांचा कल मानवतावादी व विज्ञानवादी धर्म म्हणून बौद्ध धम्माकडे वळला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चिरंतन प्रेरणा देणारे विचार, वाचा आणि आत्मसात करा, जाणवेल परिवर्तन.
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा





वयाच्या 64 व्या वर्षी बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्ली मध्ये निधन झाले. निधनानंतर विशेष विमानाने त्यांचे पार्थिव मुंबई मध्ये आणण्यात आले. दादर येथील चैत्यभूमीवर त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आला. बाबासाहेब यांना एकूण पाच अपत्य होती. मात्र यशवंत खेरीज इतर चार अपत्ये त्यांच्या वयाची दोन वर्षे पूर्ण होण्याच्या आतच दगावली होती.