Mahaparinirvan Din 2023: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चिरंतन प्रेरणा देणारे विचार, वाचा आणि आत्मसात करा, जाणवेल परिवर्तन
Dr. Babasaheb Ambedka | (Photo Credits: Wikipedia Commons)

Dr. Babasaheb Ambedkar Thoughts In Marathi: भीमराव रामजी आंबेडकर (Bhimrao Ramji Ambedkar) अर्थातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर. ज्यांना अवघा भारत आणि जग 'भारतरत्न', 'भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार' आणि 'भारतातील संबंध मानव जातीचे उद्धारकर्ते', 'सामाजित चळवळीचे प्रणेते','बहुआयामी व्यक्तीमत्व' म्हणून ओळखले जाते. एक असे व्यक्तीमत्व, ज्यांना जगभरातील काही मोजक्या लोकांमध्ये गणले जातात. उच्चविद्याविभूषीत 'बौद्ध कार्यकर्ते', 'इतिहासकार', 'राजकीय नेते', 'विद्वान', 'अर्थशास्त्रज्ञ', 'लेखक', 'वक्ते', 'मानववंशशास्त्रज्ञ', 'तत्त्वज्ञ', 'न्यायशास्त्रज्ञ' आणि 'संपादक' अशा नानाविध भूमिका त्यांनी आपल्या संबंध आयुष्यामध्ये निभावल्या. ते भारताचे पहिले कायदा मंत्रीही राहिले आहेत. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 आणि मृत्यू 6 डिसेंबर 1956 रोजी झाला. त्यांच्या निधनाचा दिवस महापरीनिर्वाण दिन म्हणून पाळला जातो. या दिनानिमित्त विविध कार्यक्रम, समारंभांचे आयोजन करण्यात येते. आपणही या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार (Dr. Babasaheb Ambedka Quotes In Marathi) येथे वाचू शकता. जे आत्मसात केल्याने तुम्हाल अल्पावधीतच चांगले परिवर्तन पाहायला मिळू शकते.

डॉ. आंबेडकर म्हणतात की, मला वाटत नाही की भारतीय म्हणून आपली निष्ठा कोणत्याही स्पर्धात्मक निष्ठेने प्रभावित व्हावी. मग ती निष्ठा आपल्या धर्मातून, आपल्या संस्कृतीतून किंवा आपल्या भाषेतून उद्भवलेली असो. मला वाटते की सर्व लोक प्रथम भारतीय असावेत, भारतीयच असावेत आणि भारतीयच नसावेत.