Mahaparinirvan Din 2023 Wishes (Photo Credit - File Image)

Mahaparinirvan Din 2023 Wishes:  डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (Dr. Bhimrao Ramji Ambedkar) ज्यांना आपण सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) या नावाने ओळखतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे जनक म्हटले जाते. 06 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे निधन झाले. दरवर्षी 6 डिसेंबर हा दिवस बाबासाहेबांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Din 2023) म्हणून साजरा केली जाते. हा दिवस साजरा करण्यामागेचे कारण म्हणजे बाबा साहेबांना आदरांजली अर्पण करणे. आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्यामुळे भीमराव आंबेडकर यांचेही अंत्यसंस्कार बौद्ध धर्माच्या विधीप्रमाणे करण्यात आले.

परिनिर्वाण दिन हा बौद्ध धर्माच्या अनेक तत्त्वांपैकी आणि उद्दिष्टांपैकी एक आहे. ज्यानुसार निर्वाण प्राप्त करणारी व्यक्ती सांसारिक आसक्ती, मोह, इच्छा, जीवनातील वेदना यापासून मुक्त राहते.  महापरिनिर्वाण दिनानिमित्त HD Images, WhatsApp Status, Messages द्वारा तुम्ही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करू शकता. (हेही वाचा - Mahaparinirvan Diwas 2023: डॉ. बाबासाहेब आंबेडकर 'महापरिनिर्वाण दिन' तारीख आणि महत्त्व घ्या जाणून)

विश्वरत्न, भारतरत्न, प्रज्ञासूत्र, क्रांतिसूर्य,

भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव,

परमपूज्य, बोधीसत्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!

Mahaparinirvan Din 2023 Wishes (Photo Credit - File Image)

मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची,

तू जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची...

तू देव नव्हतास, तू देवदूतही नव्हतास,

तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास… महासूर्याला अभिवादन!

Mahaparinirvan Din 2023 Wishes (Photo Credit - File Image)

ज्यांच्या आचार-विचारांत भरली होती राष्ट्रनिष्ठा

ज्यांनी लोकांच्या न्यायहक्कासाठी प्रयत्नांची केली परिकाष्ठा

त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन!

Mahaparinirvan Din 2023 Wishes (Photo Credit - File Image)

एक उत्तम कलाप्रेमी, शिक्षणप्रेमी, गुणवंत,

बुद्धिमान असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना

महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम!

Mahaparinirvan Din 2023 Wishes (Photo Credit - File Image)

आपल्या देशासाठी आणि समाजासाठी

अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महापुरुषास महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन!

Mahaparinirvan Din 2023 Wishes (Photo Credit - File Image)

बौद्ध धर्माचे अनुयायी मानतात की त्यांचे बौद्ध गुरू डॉ. भीमराव आंबेडकर हे सद्गुरु होते. भीमराव आंबेडकरांच्या अनुयायांच्या मते डॉ. भीमरावांनाही त्यांच्या कार्यातून निर्वाण मिळाले होते, म्हणून त्यांची पुण्यतिथी हा महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. . डॉ. भीमराव आंबेडकर यांनी अनेक वर्षे बौद्ध धर्माचा अभ्यास केल्यानंतर 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांच्या मृत्यूनंतर बौद्ध धर्माच्या नियमांनुसार त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले.