सध्याच्या तरुणाईमध्ये आपण सुंदर दिसावे यासाठी विविध उपाय करतात. तसेच केसांपासून ते पायांच्या नखांपर्यंत एखाद्याचे लक्ष जावे यासाठी सुद्धा काही जण आपल्या आरोग्याची विशिष्ट पद्धतीने काळजी घेतात. त्यापैकीच केसांसंदर्भात असून ते सुंदर दिसावे म्हणून हेअर कलर किंवा त्याला योग्य आकार देऊन वाढवले जातात. मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये केसांची चमक कायम रहावी म्हणून बाजारात विविध कंपन्यांचे हेअर सिरम उपलब्ध आहेत. ते वापरल्याने केसांची चमक आपल्याला दिसून येते. मात्र केसांना हेअर सिरिम लावण्याचे फायदे आहेतच. पण ते योग्य प्रकारे कसे लावावे याची सुद्धा माहिती असणे फार महत्वाचे आहे.
केसांना जर तुम्ही हेअर सिरम लावत असल्यास तुमचे केस किती मोठी आहेत हे पहा. त्याचसोबत केस धुतल्यानंतरच हेअर लावावे. काही जण हेअर सिरम मुळे केस नीट राहतात म्हणून लावतात. परंतु हे चुकीचे असून ते केवळ कोरड्या केसांना लावणे योग्य मानले जाते. त्यामुळे जर तुमचे केस तेलकट असल्यास त्यावर हेअर सिरम लावणे टाळा. तर जाणून घ्या हेअर सिरम लावण्याचे फायदे काय आहेत? (Health Tips: थंडीत त्वचा कोरडी पडत असल्यास मदत करतील हे '5' झटपट उपाय)
-हेअर सिरम केसांच्या मुळांना त्यांची वाढ होण्यास मदत होते. तसेच केसांना चमक आणि अधिक मजबूत होतात.
-तसेच केसांचा उन्हासह प्रदुषणापासून बचाव करते.
-हेअर सिरम खरेदी करताना लक्षात असू द्या की, ते थर्मल प्रोटेक्शन युक्त असावे.
-कुरळे केस बहुतांश वेळा कोरड्या पद्धतीचे असतात. त्यामुळे त्यांना मसाज करणे थोडे कठीणच असते. मात्र हेअर सिरम लावून केसांना मसाज करणे सोपे होते.
हेअर सिरम लावण्यासाठी हातावर त्याचे 6-6 थेंब घेऊन हलक्याने केसांच्या मुळांना लावावे. असे तुम्ही दोन ते तीन वेळा करु शकता. मात्र लक्षात असू द्या की, सिरमचा अधिक वापर केल्याने केस अधिक चिपचिपी दिसतात.