
युगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) उद्या 14 एप्रिल रोजी देशभरात साजरी केली जाईल. बाबासाहेब आंबेडकर हे समानता आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जातात. यामुळेच त्यांचा जन्मदिवस हा ‘समानता दिवस‘ आणि ‘ज्ञान दिन‘ म्हणून देखील साजरा केला जातो. रामजी व त्यांच्या पत्नी भीमाबाई यांच्या पोटी 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशमधील महू येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे संपूर्ण जीवन मानव कल्याणासाठी वेचले. समाजातून विषमता नष्ट व्हावी, समाजात एकता, समता, बंधुतेची भावना रुजावी, प्रत्येकाला सन्मानाने, स्वाभिमानाने जगण्याचा हक्क मिळावा यासाठी डॉ.बाबासाहेबांनी लढा दिला.
डॉ. बाबासाहेबांनी केलेला महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृती दहनाचे आंदोलन, शेतकरी हक्कांच्या चळवळीसारखे दिलेले लढे, रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेतील त्यांची भूमिका हे लढे देशाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक सुधारणांच्या चळवळीतील क्रांतिकारी टप्पे आहेत.
तर आजच्या या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनाचे औचित्य साधत Images, Whatsapp Status, Wishes, Quotes, Greetings, Messages द्वारे शुभेच्छा देऊन साजरा करा भीम जयंतीचा उत्सव.





दरम्यान, उच्चविद्याविभूषित असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा, अर्थशास्त्र राज्यशास्त्र, समाजशास पत्रकारिता, जलसंधारण अशा अनेक विषयांवर संशोधन व लिखाण केले आहे. जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना, भक्कम लोकशाही व्यवस्था बाबासाहेबांनी देशाला दिली. स्वातंत्र्यानंतरची सत्तर वर्षे आपला देश अखंड, एकसंध, सार्वभौम राहिला, लोकशाही दिवसेंदिवस मजबूत होत गेली, याचे श्रेय डॉ. बाबासाहेबांच्या कार्याला, विचारांना, दूरदृष्टीला आहे. त्यांचे विचार हे कुठल्या एका जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या, प्रांताच्या कल्याणासाठी नव्हते, तर अखिल मानवजातीच्या कल्याणाची ताकद त्यांच्या विचारांमध्ये होती व आहे.