
Bhim Jayanti 2023 Quotes in Marathi: बाबासाहेब भीमराव आंबेडकर भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक महान क्रांतिकारकांपैकी एक आहेत. त्यांनी भारताची राज्यघटना तयार केली. म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटलं जातं. बाबा साहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू नगर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ आणि आईचे नाव भीमाबाई सकपाळ. डॉ.बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचे जीवन संघर्षाने भरलेले होते. त्यांना लहानपणापासूनच जातीय भेदभाव आणि विषमतेचा सामना करावा लागला. आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ते समाजातील हक्क, समता आणि न्याय यासाठी लढत राहिले.
भीमराव आंबेडकरांनी त्यांच्या शिक्षणासाठी खूप मेहनत घेतली. त्यांनी उच्च शिक्षण घेतले आणि अखेरीस लंडनच्या इंग्रजी विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवून ते भारतात परतले. भारतात परतल्यानंतर त्यांनी आपले आयुष्य समाजसुधारणेच्या कार्यासाठी वाहून घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त Images, Messages, Wishes च्या माध्यमातून शेअर त्यांचे अनमोल विचार आपल्या मित्र-परिवारांपर्यंत नक्की शेअर करा. खालील ईमेज डाऊनलोड करून तुम्ही आपल्या सोशल मीडियाद्वाराचे बाबासाहेबांचे खास विचार शेअर करू शकता.







बाबासाहेबांचा मृत्यू 6 डिसेंबर 1956 रोजी राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथे झाला. भीमराव आंबेडकर यांनी त्यांचे प्रारंभिक शिक्षण मुंबईतील एल्फिन्स्टन हायस्कूलमधून घेतले. या शाळेतील ते एकमेव अस्पृश्य विद्यार्थी होते, त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. भीमराव आंबेडकर यांनी 1907 साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. बाबासाहेबांनी 1912 साली बॉम्बे युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र विषयात शिक्षण पूर्ण केले.