
दिवाळीत येणारी कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजेच बलिप्रतिपदा. साडेतीन मुहूर्तापैकी एक असा हा दिवस. याच दिवसाला दिवाळी पाडवा असेही म्हटले जाते. याच दिवशी विष्णूने वामन बटूचे रूप घेऊन अनाठायी औदार्य दाखवणाऱ्या उदार अशा बळी राजाला कट करून पाताळात गाडले. बळीला पाताळाचे राज्य देऊन विष्णू त्याच्या राज्यात द्वारपाल बनला. अशी ही आख्यायिका आहे.
सोबतच अजून एक आख्यायिका प्रचलित आहे, ती अशी की, बलिप्रतिपदेतला बली हा असुर होता, शेतकरी नव्हे. शेतकऱ्यांचा बळी राजा म्हणजे खुद्द श्रीकृष्णाचा मोठा भाऊ बलराम हा होय. त्यावरूनच 'इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो' ही म्हण रूढ झाली आहे.
महाराष्ट्रात या दिवशी स्त्रिया आपल्या पतीला आणि सासरच्या इतर मंडळींनाही ओवाळतात. पत्नीच्या औक्षणानंतर पती तिला ओवाळणीत छानशी भेटवस्तू देतो. नवविवाहित दाम्पत्य पत्नीच्या माहेरी जाऊन हा 'दिवाळसण' साजरा करतात. या दिवशी जावयाला आहेर करण्याची प्रथा आहे.
आर्थिक दृष्टीने या दिवसाला व्यापारी नव्या वर्षाची सुरवात मानतात. लक्ष्मीपूजन करून वर्षाचा आरंभ केला जातो. तेव्हा या अशा शुभ दिनी तुमच्या आप्तेष्टान्ना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आणले आहेत हे खास मेसेजेस. (हेही वाचा. Diwali Safety Tips: अस्थमा, हृदय विकारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांनी दिवाळीत अशी स्वत:ची काळजी)

साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे,
उत्तम दिनाचे माहात्म्य आहे,
सुखात जावो तुम्हाला हा पाडवा,
असाच राहो नात्यातला गोडवा.

अंधाराला दूर लोटू,
प्रकाशाला मारू मिठी,
एक पणती आपल्यामधल्या,
निखळ अशा नात्यासाठी.

पाडव्याच्या शुभमुहूर्तावर,
एकात्मतेचे दिवे लावू,
भिन्न विभिन्न असलो तरीही,
सारे मनाने एक होऊ.

आला पाडवा,
रांगोळ्यांच्या चला सजवूया आराशी,
इच्छित लाभो मनी असे ते,
सुखही नांदो पायाशी.

आभाळी सजला मोतियांचा चुडा,
दारी दिव्यांचा सोनेरी सडा,
गंध गहिरा दरवळला उटण्याचा,
आला दिवाळसण आनंद लुटण्याचा.
आपल्या कुटुंबियांना आणि मित्रपरिवाराला अशा छान छान शुभेच्छा देऊन खुश करा. या दिवसाला अजून खास बनवा. लक्षमीची पूजा करा. तुमची आयुष्यात सदैव भरभराट होवो. तुम्हाला जे इच्छित आहे ते लाभो याच सदिच्छा आणि पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.