दिवाळी 2018 (Photo Credits: Facebook)

दिवाळी हे हिंदू लोकांचे सर्वात मोठे आणि महत्वाचे पर्व मानले जाते. या सणाचा उत्सव तब्बल पाच दिवस चालतो. अंधारावर प्रकाशाचा विजय मिळवणाऱ्या या सणाची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते. पाच दिवसांच्या या उत्सवामध्ये धनत्रयोदशीसोबत नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असे पाच दिवस साजरे केले जातात. प्रत्येक दिवसाचे स्वतःचे असे महत्व आहे, यामध्ये सर्वात महत्वाचा दिवस मानला जातो तो लक्ष्मीपूजनाचा. या दिवशी अमावस्येच्या अंधाऱ्या रात्री दिव्यांच्या प्रकाशात लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी ठराविक वेळी केली गेलेली पूजा फारच लाभदायक मानली जाते. याचप्रकारे इतर दिवसांच्या पुजेचेही काही शुभ मुहूर्त आहेत. चला तर जाणून घेऊया काय आहेत हे मुहूर्त

1. धनत्रयोदशी – 5 नोव्हेंबर 2018

यावर्षी धनत्रयोदशी 5 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. यादिवशी नवी भांडी, सोने-चांदीची दागिने, नाणी विकत घेणे शुभ मानले जाते. या दिवशी मृत्यू देवता यमाचे पूजन करण्यासाठी रात्रभर दिवे जाळले जातात, म्हणूनच याला यमदीपदान असेसुद्धा म्हटले जाते.

धनत्रयोदशी पूजेचे शुभ मुहूर्त -

शुभ मुहूर्त – संध्याकाळी 6.05 ते रात्री 8.01 पर्यंत

प्रदोष काल - संध्याकाळी 5.29 ते रात्री 07.00 पर्यंत

वृषभ काल - संध्याकाळी 6.05 ते रात्री 8.01 पर्यंत

2. नरक चतुर्दशी - 6 नवंबर 2018

यावर्षी नरक चतुर्दशी 6 नवंबर 2018 रोजी साजरी केली जाईल. नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने  नरकासुर दानवाचा वध करून,  त्याच्या तावडीतील सर्व कन्यांची मुक्तता केली व अदितीची मौल्यवान कर्णकुंडले परत प्राप्त केली होती. या दिवशी भल्या पहाटे उठून अभ्यंग स्नानाचीही परंपरा आहे.

नरक चतुर्दशीचे शुभ मुहूर्त -

अभ्यंगस्नान आणि पूजेचा शुभ मुहूर्त – सकाळी 4.30 से 06.27 पर्यंत

पूजा करण्याची वेळ - 1 तास 57 मिनट.

3. लक्ष्मीपूजन - 7 नवंबर 2018

दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. हा दिवस दिवाळीतील सर्वात महत्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी सूर्य आपल्या दुसऱ्या चरणात प्रवेश करतो. अमावस्या असूनही या दिवसाला अतिशय शुभ मानले जाते. याच दिवशी प्रभू रामचंद्र, सीतामाई व लक्ष्मणासोबत, 14 वर्षांचा वनवास सोसून अयोध्येत घरी परतले होते.

लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त -

शुभ मुहूर्त – संध्याकाळी 05:57 ते 07:53 पर्यंत

प्रदोष काल - संध्याकाळी 05:27 ते 08:06 पर्यंत

वृषभ काल – संध्याकाळी 05:57 ते 07:53 पर्यंत

4. बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा) - 8 नवंबर 2018

लक्ष्मीपूजनानंतरचा दुसरा दिवस पाडवा म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी श्रीकृष्णाने इंद्र देवाच्या कोपाने झालेल्या अतिवृष्टीपासून गोकुळातल्या प्रजेचे संरक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता. म्हणून या दिवसा दिवशी गोवर्धन पूजादेखील केली जाते. या दिवशी सुवासिनी आपल्या पतीला ओवाळून त्यांच्या धन, आरोग्य, समाधानासाठी प्रार्थना करतात.

गोवर्धन पूजेचा शुभ मुहूर्त

सकाळचा मुहूर्त – सकाळी 06:37 ते 08:48 पर्यंत

संध्याकाळचा मुहूर्त – दुपारी 03:20 ते संध्याकाळी 05:31 पर्यंत

5. भाऊबीज​ - 9 नवंबर 2018

दिवाळीच्या पाच दिवसांमधील सर्वात शेवटचा दिवस भाऊबीज म्हणून साजरा केला जातो. हा दिवस बहिण आणि भावाच्या प्रेमाचे प्रतिक मानला जातो. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला, म्हणून या दिवसाला ‘यमद्वितीया’ असे नाव मिळाले.

भाऊबीजेचा शुभ मुहूर्त

मुहूर्त प्रारंभ – दुपारी 1 वाजून 10 मिनिटांपासून

मुहूर्त समाप्त - दुपारी 3 वाजून 27 मिनिटांपर्यंत

मुहूर्त अवधि- 2 तास 17 मिनिट