Bird Flu: भारतात बऱ्याचदा बर्ड फ्लू चा आजार येतो कसा? जाणून घ्या कारण
Birds (PC - Reflection thru my lenses & Vidyasagar Hariharan)

Bird Flu: भारतात सध्या कोरोना व्हायरसह  आता बर्ड फ्लू ने चार राज्यात थैमान घातले आहे. या राज्यातील 12 जागांवर बर्ड फ्लू H5N1 प्रकरणी पुष्टी झाली आहे. केंद्र सरकारने तातडीने संबंधित राज्यांना सावधगिरी  बाळगण्याबद्दल पावले उचलण्यास सांगितले आहे. परंतु असा प्रश्न उपस्थितीत होतो की,  भारतात बऱ्याचदा बर्ड फ्लू चा आजार येतोच कसा? देशात तो येण्यामागे नेमके कारण काय आहे? तर जाणून घ्या या संबंधित पशुपालन आणि डेयरी मंत्रालयाने काय म्हटले आहे.

बर्ड फ्लू म्हणजे एवियन इंफ्लूएंजा संपूर्ण देशातील काही दशकांपासून पसरत आहे. गेल्या काळात बर्ड फ्लू ने चार वेळा जगात आपले थैमान घातले होते. भारतात प्रथम 2006 मध्ये बर्ड फ्लू आजारा मोठ्या प्रमाणात पसरला होता. त्यानंतर भारतात चार वेळा म्हणजेच 2006, 2012, 2015 आणि आता 2021 मध्ये बर्ड फ्लू पसरत चालला आहे.(Bird Flu: एवियन फ्लू चा धोका! जाणून घ्या काय आहेत बर्ड फ्लूची लक्षणे, कारणे, उपचार आणि कशाप्रकारे करू शकाल बचाव)

भारतात बर्ड फ्लू वर्षाच्या अखरेपासून सर्वत्र हळूहळू पसरत चालला आहे. म्हणजेच थंडीच्या दिवसातच त्याचे संक्रमण होण्यास सुरुवात झाली आहे. अधिकांश संक्रमणाची प्रकरणे ही सप्टेंबर किंवा ऑक्टोंबर ते फेब्रुवारी- मार्च दरम्यान समोर येतात. पण मुद्दा हा आहे की भारतात बर्ड फ्लू चे संक्रमण कसे पसरते. यामागे दोन कारणे आहेत. प्रथम म्हणजे स्थलांतरित पक्षी आणि दुसरे वस्तूंच्या माध्यमातून.

पशुपालन आणि डेअरी मंत्रालयाने भारतात बर्ड फ्लूचे संक्रमण हे स्थलांतरित पक्षांच्या माध्यमातून पसरतो. यानंतर संक्रमण वस्तूंच्या माध्यमातून. जसे एखादा व्यक्ती, कपडे, सामान आणि खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या माध्यमातून देशात आला आहे. भारत सरकारने 2005 मध्ये बर्ड फ्लू थांबवण्याचा अॅक्शन प्लॅन सुद्धा तयार करण्यात आला होता. तेव्हा पासूनच हे अपडेट करत फॉलो केले जात आहे.

राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल आणि केरळ येथे बर्ड फ्लू मुळे मोठ्या प्रमाणात पक्षांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या चार राज्यात उपयुक्त पावले उचलण्याचे निर्देशन दिले गेले आहेत. तसेच कंट्रोल रुम तयार करुन लक्ष ठेवले जात आहे. तर बर्ड फ्लू पक्षांची विष्ठा, स्वॅब आणि मळाच्या माध्यमातून हवेत पसरतो. यासाठी केंद्र सरकारने त्यांच्या अॅक्शन प्लॅनमध्ये स्थलांतरित पक्षांच्या मार्गाचा तपास व्हावा असे सांगण्यात आले आहे. वन विभागाचे लोकांनी पर्यटक आणि सामान्य नागरिकांनी स्थलांतरित पक्षांपासून दूर ठेवावे.(Rajasthan Bird Flu: कवाळ्यानंतर आता स्थलांतरित पक्षांचा सुद्धा बर्ड फ्लू मुळे मृत्यू होत असल्याने खळबळ)

तसेच ज्यावेळी बर्ड फ्लू चा तपास केला जातो त्यावेळी स्थलांतरित पक्षांच्या प्रजननाच्या परिसावर लक्ष ठेवले जाते. अशातच जलाशय आणि नद्यांच्या ठिकाणांवर ही नजर ठेवले जातात. जेथे पक्षी नेहमीच येत जात असतात. पण सध्या वाढत्या बर्ड फ्लू च्या आजारामुळे प्रत्येकाने सावधगिरी बाळगावी असे आवाहन केले जात आहे.