Rajasthan Bird Flu: राजस्थान मधील विविध ठिकाणी बर्ड फ्लू मुळे कावळ्यांचा मृत्यू होत असल्याची बातमी सातत्याने दिली जात आहे. याच दरम्यान आता दौसा येथे सुद्धा बर्ड फ्लू चा शिरकाव झाला असून येथे पक्षी मृतावस्थेत आढळून आल्याने मोठ्या प्रमाणात चिंता वाढली आहे. कावळ्यांसह बगळ्यांचा ही मृत्यू होऊ लागला आहे. दौसा शहरातील खटीकन मोहल्ला स्थिीत एका मंदिराच्या परिसरातून अशी माहिती दिली गेली की, काही मृत पक्षी आढळून आले आहेत. त्यानंतर वन विभागाने एसीएफ अनिल गुप्ता आणि पशुपालन विभागाच्या टीमसोबत घटनास्थळी धाव घेतली. या मृत पक्षांना बर्ड फ्लू झाल्याची संभाव्यता दिसून आल्याने त्यात एक कावळा आणि 5 Pond Heron यांचा समावेश असल्याचे दिसले.
या वेळी पशुविभागाचे कर्मचारी पीपीई किट घालून घटनास्थळी पोहत मृत पक्षांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांचे नमुने परिक्षणासाठी पाठवण्यात आले. तपासात असे समोर आले की, या पक्षांचा मृत्यू एखाद्या आजारामुळे झाला आहे. त्यानंतर संपूर्ण वन विभाग अलर्ट झाला आहे. संपूर्ण जिल्ह्यात मॉनिटरिंग करण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली असून विविध ठिकाणाच्या पक्षांवर लक्ष ठेवले जात आहे.(COVID-19 च्या उपचारासाठी लाल मुंग्यांची चटणी ठरणार प्रभावी? CSIR, AYUSH मंत्रालयाला 3 महिन्यांत निर्णय घेण्याचे निर्देश)
तर राजधानी जयपुर मध्ये ही कावळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर गेल्या 24 तासात 7 जिल्हायात 135 कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये हनुमानगढ मधील 88, झालावाडा मध्ये 13, बारा मध्ये 12, जयपुर आणि जोधपुर मध्ये 7-7 आणि पालीसह बिकानेर मध्ये प्रत्येकी 4 कावळ्यांचा मृत्यू झाला आहे.