इस्लाम धर्मामध्ये तीन ईदींपैकी एक म्हणजे बकरी ईद (Bakrid). इस्लाम कॅलेंडरमधील 12 वा महिना जिल्हेज च्या दहाव्या दिवशी बकरी ईद साजरी केली जाते. ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार यंदा ही ईद 31 जुलै दिवशी सुरू होईल आणि 1 ऑगस्टच्या संध्याकाळपर्यंत साजरी केली जाते. दरम्यान हा बकरी ईद चा सण ईद उल-अज़हा (Eid al-Adha) म्हणून देखील साजरा केला जातो. या दिवशी इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ कुराणमधील बळीची घटना साजरी केली जाते. जगभरात मुस्लीम बांधव या दिवशी बकर्याचा बळी देऊन हा सण साजरा करतात.
मुस्लिम धर्मीयांसाठी बकरी ईद हा दिवस खास असण्याच अजून एक कारण म्हणजे मक्का या पवित्र स्थळी गेलेल्यांच्या हज यात्रेचा हा अखेरचा दिवस असतो. हज यात्रा ही मुस्लिम धर्मियांसठी पवित्र यात्रा असते, आयुष्यात किमान एकदा ती करण्याची अनेकांची इच्छा असते.
कधी असतो बकरी ईदचा सण?
सर्वसाधारणपणे मागील ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार ईदची तारीख बदलत असते. अंदाजे मागील ईदच्या 11 दिवसांनी प्रत्येक वर्षी बकरी ईद येते.
ईद उल-अज़हा किंवा बकरी ईद सणाचं महत्त्व
ईद उल-अज़हा ही 'बलिदानाची ईद' आहे. मुस्लिम मान्यतांनुसार, हजरत इब्राहिम आपले पुत्र हजरत इस्माईल ला याच दिवशी अल्लाह च्या आदेशावरुन अल्लाहासाठी बलिदान देण्यासाठी जात होते. मात्र अल्लाह ने हजरत इस्माइलला जीवनदान दिले. त्याच त्याग आणि बलिदानाच्या स्मृतिप्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो.
रमजान हा मुस्लीम बांधवांचा पवित्र महिना आहे. तो संपल्यानंतर सुमारे 70 दिवसांनंतर बकरी ईद (Bakra Eid) साजरी केली जाते. या दिवशी कुर्बानीला विशेष महत्त्व असतं. जगभरात बकरी ईदचा हा सण वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. भारत, पाकिस्तानामध्ये बकरी ईद असते. जर्मन, फ्रेंच मध्ये ओफ़रफेस्ट म्हणून ओळखला जातो. तुर्की मध्ये कुर्बान बेरामाइ म्हणून ओळखला जातो.