कोरोना विषाणुने (Coronavirus) संपूर्ण जग हादरुन गेले असून अनेक जण या रोगाच्या विळख्यात अडकल्याचे समजत आहे. यातच ब्रिटेनचे (Britain) पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनाही कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असून स्वताला विलगीकरणात ठेवत असल्याचे त्यांनी नुकतेच सांगितले आहे. यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narenra Modi) यांनी बोरिस यांना धीर दिला आहे. आपण योद्धा आहात, लवकरच बरे व्हाल अशा आशायाचे मोदी यांनी ट्वीट केले आहे. कोरोना विषाणुने संपूर्ण जगात थैमान घातला आहे. कोरोणाची लागण झाल्याने आतापर्यंत 21 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 4 लाखांहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. सध्या 170 पेक्षा अधिक देश कोरोना विषाणूशी लढा देत आहे.

बोरिस जॉन्सन यांनी ट्विट करत स्वत: आपल्याला करोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले आहे की, “गेल्या 24 तासांपासून मला काही हलकी लक्षणे जाणवत होती. तपासणी केली असता पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे. मी सध्या विलगीकरणात आहे. आपण सध्या करोना व्हायरसशी लढा देत असून मी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सरकारचे नेतृत्त करत राहणार आहे". बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती नरेंद्र मोदी यांना कळताच त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून त्यांना धीर दिला आहे. तसेच, आपण युद्धा आहात, लवकरच तुम्ही या अडचणीतून बाहेर निघाल, अशी त्यांनी सदिच्छा व्यक्त केली आहे. हे देखील वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केला 'बनो कोरोना वॉरियर्स' असा संदेश देणारा चिमुकलीचा खास व्हिडिओ (Watch Video)

नरेंद्र मोदी यांचे ट्वीट-

ब्रिटनमध्ये आतापर्यंत 12 हजार लोकांना करोनाची लागण झाली असून 578 जणांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती गंभीर असल्याने ब्रिटनमध्ये संचारबंदी घोशषीत करण्यात आली आहे. याआधी ब्रिटिश राजघराण्याचे प्रिन्स चार्ल्स यांनी करोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली होती. शाही राजघराण्यातही करोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता पंतप्रधानांनाही करोनाची लागण झाल्याने गांभीर्य वाढले आहे.