Deenadayalan Vishwa (PC - Twitter)

तामिळनाडू (Tamil Nadu) च्या अव्वल टेबल टेनिसपटूंपैकी एक दीनदयालन विश्वा (Deenadayalan Vishwa) यांचा गुवाहाटी विमानतळावरून शिलाँगला जात असताना अपघातात मृत्यू झाला. अपघातानंतर त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. 83 व्या वरिष्ठ राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी गुवाहाटी ते शिलाँगला जात असताना रविवारी त्याचा अपघात झाला. गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

तामिळनाडूचा टेबल टेनिसपटू दीनदयालन हा विश्व तमिजागा टेबल टेनिस असोसिएशन (TTTA) राज्य पुरुष संघाचा भाग होता. मेघालयची राजधानी शिलाँग येथे होणाऱ्या 83 व्या वरिष्ठ राष्ट्रीय आणि आंतरराज्यीय टेबल टेनिस स्पर्धेत भाग घेण्यासाठी तो जात होता. या अपघातात पर्यटक वाहनाच्या चालकाचाही गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. दीपाल दास असं या वाहन चालकाचं नाव आहे. (हेही वाचा - Covid-19 Update: भारतात पुन्हा वाढतोय कोरोना विषाणूचा धोका? एका आठवड्यात कोरोना रुग्णांमध्ये 35 टक्क्यांची वाढ)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्विफ्ट डिझायर कार गुवाहाटी विमानतळावरून शिलाँगला जात असताना हा अपघात झाला. NH-6 वर मागून येणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात आलेल्या ट्रकने कारला धडक दिली. त्यानंतर कार 50 मीटर दरीत कोसळली.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून ट्रकचालक व कारमधील जखमींना तात्काळ नोंगपोह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. गंभीर दुखापतींमुळे त्याला नॉर्थ ईस्टर्न इंदिरा गांधी रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड मेडिकल सायन्सेस (NEIGRIHMS) हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले, तर मृताचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी नोंगपोह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहेत.