Cardless Cash Withdrawals: SBI च्या ATM Card शिवाय काढू शकता रोख रक्कम; जाणून घ्या सुरक्षित पैसे काढण्याची पद्धत
ATM Machine | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Money Control.com)

Cardless Cash Withdrawals: बँके संदर्भातील कोणताही व्यवहार सुरक्षित असणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही प्रत्येकवेळी बँकेत न जाता पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर करता. अनेकदा तुमचं एटीएम घरी विसरतं. त्यामुळे तुम्हाला मनस्ताप सहन करावा लागतो. परंतु, आता तुम्हाला एटीएममधून पैसे काढण्यासाठी कार्डची आवश्यकता नाही. कारण, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ग्राहक आता कार्डलेस कॅश विदड्रॉल सुविधेचा (SBI Cardless Cash Withdrawal Facility) लाभ घेऊ शकतात. या सुविधेद्वारे डेबिट कार्डशिवाय बँकेच्या एटीएममधून पैसे सुरक्षितपणे काढता येतात. एसबीआयच्या योनो अॅपद्वारे डेबिट कार्ड न वापरता एटीएममधून रोख रक्कम काढता येते. आज आपण या लेखातून एसबीआयच्या डेबिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे कसे काढायचे ते जाणून घ्या... (वाचा - ATM म्हणजे काय? Automated Teller Machine चा वापर करून सुरक्षित आर्थिक व्यवहार करताना या गोष्टींबाबत अलर्ट रहाच!)

डेबिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा -

  • इंटरनेट बँकिंग अॅप योनो (YONO) डाउनलोड करा.
  • व्यवहार सुरू करण्यासाठी तुम्हाला 'योनो कॅश ऑप्शन' वर जावे लागेल.
  • यानंतर एटीएम सेक्शनमध्ये जा आणि तुम्हाला किती पैसे काढायचे आहेत ती रक्कम तेथे टाका.
  • एसबीआय तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइलवर योनो कॅश ट्रांजेक्शन क्रमांक पाठवेल.
  • हा नंबर चार तासांसाठी वैध असेल.
  • SBI ATM वर जा आणि एटीएम स्क्रीनवर ''YONO Cash'' हा ऑपशन निवडा.
  • यात YONO कॅश ट्रांजेक्शन नंबर टाका.
  • योनो कॅश पिन प्रविष्ट करा आणि Submit ऑपशनवर क्लिक करा.
  • त्यानंतर एटीएममधून व्यवहाराची संपूर्ण माहिती असलेली प्रींट आणि रोख रक्कम घ्या.

एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही एसबीआय कार्डलेस कॅश विद्ड्रॉल सुविधेचा लाभ केवळ एसबीआय एटीएममध्येचं घेऊ शकता. ही सुविधा डेबिट कार्ड कमी करण्यासाठी आणि एटीएम व्यवहार करताना होणारी फसवणूक टाळण्यासाठी आहे. (वाचा - ATM च्या सहाय्याने करा बँकेची 'ही' कामे, रांगेत उभे राहण्याचा वेळ वाचेल)

किती पैसे काढू शकता ?

या व्यवहारामध्ये एसबीआय ग्राहक किमान 500 आणि जास्तीत जास्त 10,000 रुपये काढू शकतात. काही तांत्रिक अडचणीमुळे एटीएमच्या व्यवहारात बिघाड झाल्यामुळे आणि पैसे काढण्यास सक्षम नसल्यास घाबरून जाण्याची गरज नाही. कारण, अशा वेळी आपल्या खात्यातून वजा केलेल्या रक्कमेची माहिती बँकेस त्वरित द्या.