प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: Money Control.com)

प्रत्येक बँक खाते असणाऱ्या धारकाला कोणत्याही बँकेत खाते उघडल्यावर विविध सुविधा दिल्या जातात. तसेच पासबुक, एटीएम कार्ड आणि चेक बुकची दिले जाते. मात्र सध्या खाते धारक जास्तकरुन एटीएमचा उपयोग करुन पैसै काढण्याचा मार्ग अवलंबतो त्यामुळे रांगेत उभे राहण्याचा वेळ वाचतो.

मात्र तुम्हाला माहिती आहे का ATM कार्डच्या सहाय्याने तुम्ही बँकेची इतरही कामे अगदी सोप्या आणि कमी वेळात करु शकणार आहात. तर जाणून घ्या कोणती कामे एटीएमच्या सहाय्याने तुम्ही करु शकणार आहात.(बँक खाते किंवा मोबाईल कनेक्शनसाठी आधार नंबर देणे आता ही ग्राहकाची मर्जी)

फिक्स डिपॉझिट:

प्रत्येक बँक धारकाला ATM च्या सहाय्याने फिक्स डिपॉटच्या सुविधेचा लाभ घेता येतो. यासाठी तुम्हाला बँकेच्या संकेतस्थावर अधिक माहिती दिली असून त्यामध्ये तुमच्या नावासह अन्य नियामांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

पैसे जमा करणे:

बँकेने सध्या ग्राहकांना पैसे भरण्यासाठी रांगेत उभे राहण्याचा वेळ वाचवण्यासाठी एटीएमद्वारे पैसे भरण्याची सुविधा सुरु केली आहे. यामध्ये तुम्ही दिवसाला एटीमच्या सहाय्याने 49,900 रुपयापर्यंतची रक्कम भरु शकता.

बिल भरु शकता-

टेलिफोन, वीज, गॅस किंवा अन्य दुसऱ्या प्रकारची बिल तुम्हाला एटीएम कार्डाने भरु शकता.

ट्रेन तिकिट बुकिंग-

एसबीआय बँक आपल्या ग्राहकांना एटीएमच्या सहाय्याने तिकिट बुकिंगची सुविधा उपलब्ध करुन देते. यामध्ये तुम्ही लांब प्रवासासाठीचे तिकिट बुक करु शकता.

तर ग्राहकांनी या सुविधेचा जरुर लाभ घ्यावा. तसेच प्रत्येक खाते धारकाला याबद्दल माहिती असणे आवश्यक असून त्यांचा रांगेत उभे राहण्याचा वेळ वाचणार आहे.