बँक खाते किंवा मोबाईल कनेक्शनसाठी आधार नंबर देणे आता ही ग्राहकाची मर्जी
Aadhar Card (Photo Credits: PTI)

केंद्रीय मंत्रीमंडळाने बँक खाते उघडणे किंवा मोबाईल फोनच्या कनेक्शनसाठी पुरावा म्हणून आधार कार्ड (Aadhar Card) असणे अनिवार्य असणे बंधनकारक केले होते. ही अट या कारणासाठी घालण्यात आली होती की, लोकसभा संबंधित संशोधन पारित करण्याव्यतिरिक्त व्यक्तीच्या ओळख साध्य करण्यासाठी हा नियम लागू केला होता.

संशोधनच्या आधारे व्यक्तीची गुप्त माहिती आणि नियमांचे उल्लंघन न करण्यासाठी आधार कार्डची गरज भासते. तसेच केवायासी पुराव्यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक असते. तसेज ज्या कंपन्यांकडे व्यक्तीच्या आधार कार्डबाबत माहिती असेल त्यांनी त्या व्यक्तीची गुप्त माहिती सुरक्षित ठेवण्याचे गरजेचे असते.(हेही वाचा-आधार कार्ड अपडेट: नाव, नंबर, पत्ता बदलण्यासाठी दरात बदल, द्यावे लागणार अधिक शुल्क)

मात्र नुकताच सुप्रीम कोर्टाने आधार कार्ड संबंधित एका निर्णयाची घोषणा केली होती. त्यावेळी कोर्टाने असे सांगितले होते की,बँक आणि मोबाईल कनेक्शनसाठी तुमच्याकडे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड तुमची ओळखपत्र म्हणून मागू शकते. मात्र नुकत्याच घेण्यात आलेल्या निर्णयानुसार बँक खाते किंवा मोबाईल कनेक्शनसाठी आधार कार्ड देणे आवश्यक असेलच असे नाही.