West Bengal: पश्चिम बंगालच्या तुरुंगात महिला होत आहेत गरोदर; आतापर्यंत राज्यभरातील वेगवेगळ्या सुधारगृहांमध्ये 196 बाळांचा जन्म
Pregnant woman, Jail Image प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Pixabay)

West Bengal: पश्चिम बंगालच्या तुरुंगात (West Bengal Jails) बंदिस्त असतानाही महिला कैदी (Female Prisoner) गर्भवती (Pregnant) झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारागृह आणि महिला सुधारगृहांची तपासणी करणारे ॲमिकस क्युरी तपास भांजा यांनी आपला अहवाल सादर केला आहे, ज्यामध्ये उच्च न्यायालयाला सांगण्यात आले आहे की, कारागृहातील महिला कैद्यांनी आतापर्यंत 196 मुलांना जन्म दिला आहे.

दरम्यान, महिला सुधारगृहांमध्ये पुरुष कर्मचाऱ्यांच्या प्रवेशावर बंदी घालण्याची शिफारस ॲमिकस क्युरी यांनी उच्च न्यायालयाकडे केली आहे. याशिवाय महिला कैद्यांना कारागृहात आणण्यापूर्वी त्यांची गर्भधारणा चाचणी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली करण्याचे आदेश देण्याची शिफारसही करण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. (हेही वाचा -Covid-19 Vaccine for Pregnant Woman: कोविड-19 लस गर्भवती महिलांसाठी सुरक्षित- ICMR)

कोलकाता उच्च न्यायालयाने एमिकस क्युरी तापस भांजा यांना राज्यातील तुरुंगांची पाहणी करून त्यांच्या स्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. यानंतर भांजा यांनी कारागृहांची पाहणी करून अहवाल सादर केला. टाइम ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, गुरुवारी सादर केलेल्या अहवालात तापस भांजा यांनी तुरुंगात बंद असलेल्या महिला गर्भवती होत असल्याचे सांगितले आहे. आतापर्यंत तुरुंगात 196 मुलांचा जन्म झाला आहे, असं भांजा यांनी अहवालात नमूद केलं आहे. सरन्यायाधीश टीएस शिवगनम आणि न्यायमूर्ती सुप्रतीम भट्टाचार्य यांच्या खंडपीठाच्या निर्णयानुसार आता पुढील सोमवारी विभागीय खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. (वाचा - Pregnant Woman Death: इगतपुरी येथील गर्भवती महिलेचा मृत्यू रस्त्याअभावी नव्हे, वैद्यकीय अहवालात पुढे आले धक्कादायक कारण, घ्या जाणून)

सर्व महिला कैद्यांची गर्भधारणा चाचणी आवश्यक -

या अहवालात सर्व महिला कैद्यांना कारागृहात प्रवेश देण्यापूर्वी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या देखरेखीखाली गर्भधारणा चाचणी करून घेण्याच्या सूचना देण्यात याव्यात, अशी शिफारस उच्च न्यायालयाला करण्यात आली आहे. भांजा यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे की, त्यांना अलीपूर येथील महिला सुधारगृहात 15 मुले आढळली, त्यापैकी 10 मुले आणि 5 मुली होत्या. कैद्यांशी संवाद साधला असता, काही महिला कैद्यांनी कोणतीही वैद्यकीय मदत न घेता सुधारगृहात स्वतःहून मुलांना जन्म दिल्याचं सांगितलं. त्यामुळे महिला सुधारगृहांमध्ये वैद्यकीय पायाभूत सुविधांचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे, असंही भांचा यांनी अहवालात नमूद केंल आहे.

कारागृहांमध्ये कैद्यांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त -

बहुतांश महिला कारागृहांमध्ये कैद्यांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त आहे, असंही अहवालात सांगण्यात आलं आहे. दमदम सेंट्रल सुधारगृहात 400 महिला कैदी आढळून आल्याची माहिती आहे. त्यापैकी 90 महिलांना गर्दीमुळे अलीपूर महिला सुधारगृहात हलवण्यात आले आहे. जवळपास सर्वच कारागृहात अशीच परिस्थिती असल्याचंही भांजा यांनी आपल्या अहवालात नमूद केल आहे.