Pregnant Woman Death: नाशिक (Nashik) जिल्ह्यातील इगतपुरी येथे दोन दिवसांपूर्वी रस्त्या नसल्यामुळे गरोदर मातेला वेळेत उपचार मिळाले नाही. त्यामुळे तिचा आणि तिच्या गर्भात असलेल्या बाळाचा मृत्यू झाला होता. गावात रस्ता नसल्याने महिलेल्या झोळीतून नातेवाईकांनी साडे तीन किलोमीटर चालत आणले होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ पसरली. रस्ता नसल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. मात्र, या घटनेला आता वेगळी कलाटणी मिळाले आहे. या महिलेचा मृत्यू रस्त्या खराब असल्यामुळे झाला नाही तर गर्भवती महिलेने स्थानिक वैदूकडे काही औषधोपचार घेतले. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
गर्भवती महिलेने स्थानिक वैदूकडून औषधोपचार घेतले होते. त्यामुळे तीचा मृत्यू झाला आणि गर्भात असलेल्या बाळाचाही मृत्यू झाला. अशी धक्कादायक माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली. ही माहिती ऐकताच परिसरात खळबळ उडाली आहे. वनिता भावडू भगत असं गर्भवती मृत महिलेचे नाव आहे. दोन दिवसांपुर्वी रस्ता खराब असल्यामुळे नातेवाईकांनी तीला झोळीतून नेलं आणि रस्त्यातच तीचा मृत्यू झाला. तिच्या सोबत पोटातील अर्भक मृत्यूमुखी पडले. हे प्रकरण सद्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनातही उघडले होते. त्यामुळे या प्रकरणाची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली.
तीनं खालेल्या औषधामुळे तीला उलट्या झाल्या आणि प्रसती पुर्व त्रास देखील होवू लागला. मात्र या महिलेचा मृत्यू वेदनांमुळे नाही तर औषधोपचारामुळे झाला असा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला.महिलेच्या प्रसूतीची तारीख ही सप्टेंबर महिन्यातील होती, अशी माहितीही जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिली. आदिवासी पाड्यातील गर्भवती महिलेचा मृत्यू झाला या घटनेमुळे गावकऱ्यांनी शोक व्यक्त केला. दवाखान्यात पोहचण्यास उशीर झाल्यामुळे महिलेने प्राण गमावला. तळोघ ग्रामपंचायत हद्दीत जुनवणेवाडी ही आदिवासी वस्ती आहे. या ठिकाणी मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ता नसल्याने गावकऱ्यांना जवळपास अडीच किलो मीटर कच्च्या रस्त्याने पायपीट करावी लागते.