पेट्रोल पंपांवरील पंतप्रधान Narendra Modi यांचे फोटो असलेले होर्डिंग्ज हटविण्यात यावे; ECI चे निर्देश
Election Commission of India. File Image. (Photo Credits: PTI)

केंद्र शासित प्रदेश पश्चिम बंगाल (West Bengal), तामिळनाडू (Tamil Nadu), आसाम (Assam), केरळ (Kerala) आणि पुदुचेरी (Puducherry) येथे विधानसभा निवडणुका होत आहेत. याचपार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Naredra Modi) यांच्या फोटोवरून वाद पेटला आहे. पश्चिम बंगालसहीत पाच राज्यांच्या निवडणुकींच्या तोंडावर नरेंद्र मोदी यांचा फोटो कोरोना लसीकरण प्रमाणपत्रात ठेवणे योग्य नाही, असे ट्विट तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे सदस्य डेरेक ओ ब्रायन यांनी केले होते. यानंतर राज्यांच्या पेट्रोल पंपावरील नरेंद्र मोदींचे फोटो असलेले होर्डिंग्ज 72 तासाच्या आत हटवण्याचे निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) निर्देश दिले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी कोरोना विषाणूच्या लसीचा पहिला डोस घेतला. त्यानंतर देशभरात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. परंतु, यावरून वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर नरेंद्र मोदींचा ठेवण्यात आला आहे, ज्याला विरोधी पक्षांनी विरोध दर्शविला आहे. पश्चिम बंगालसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीला सुरुवात होण्यापूर्वीच भाजपने प्रचाराला सुरुवात केली आहे, असे म्हणत तृणमूल काँग्रेसने आक्रमक भुमिका घेतली आहे. "पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली असून कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर नरेंद्र मोदींचा फोटो असणे योग्य नाही", असे डेरेक ओ ब्रायन ट्विटरच्या माध्यमातून म्हणाले आहेत. यातच पेट्रोल पंपावरील नरेंद्र मोदी यांचे फोटो असलेले होर्डिंग्ज 72 तासाच्या आत हटवण्यात यावे, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. हे देखील वाचा- COVID-19 Vaccine: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस; जनतेला केलं लस घेण्याचं आवाहन

पश्चिम बंगालमध्ये 294 मतदार संघ आहेत. सर्वाधिक जास्त जागा पश्चिम बंगालमध्ये असल्याने भाजपनेही येथे सत्ता परिवर्तनासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसनेही सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी मोर्चेबांधणीवर भर दिला आहे