PM Narendra Modi | (Photo Credits: Twitter/ANI

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) संयुक्त राष्ट्र महासभेतील 76 व्या सत्राला संबोधित केले. दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसनिर्मितीसह विविध मुद्द्यांवर जोर दिला आहे. तसेच जलवायू परिवर्तन, दहशतवाद, आदी महत्वाचे मुद्दे मांडून त्यांनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. एवढेच नव्हेतर, जेव्हा भारताची प्रगती होते, तेव्हा जगाच्या प्रगतीतही हातभार लागतो, असे नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी म्हटले आहे. याचबरोबर दहशतवाचा धोका केवळ भारताला नसून संपूर्ण जगाला आहे, असेही नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्र महासभेतील 76 व्या सत्राला संबोधित केले. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्याीचाही त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. कोरोनामुळे गेल्या वर्षी महासभेचे सत्र डिजिटल प्लॅटफॉर्मवर आयोजित करण्यात आले होते. हे देखील वाचा- Farmer Protest: शेतकऱ्यांकडून येत्या 27 सप्टेंबरला भारत बंदचा इशारा, समर्थनार्थ आज गुरुग्राम येथे मशाल रॅली

नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे-

- संपूर्ण जग गेल्या दीड वर्षांपासून 100 वर्षांच्या इतिहासात कधी न आलेल्या कोरोना महामारीचा सामना करीत आहे. या महामारीमध्ये ज्यांनी आपला जीव गमावला आहे त्यांना मी श्रद्धांजली देतो आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती माझी संवेदना व्यक्त करतो.

- ही भारताच्या लोकशाहीची ताकद आहे की एक छोटा मुलगा एका रेल्वे स्थानकावरील चहाच्या टपरीवर आपल्या वडिलांची मदत करत होता. तो आज चौथ्यांदा पंतप्रधान म्हणून UNGA ला संबोधित करत आहे.

- भारत आज लस निर्मितीमध्ये मनापासून काम करत आहे. मला हे सांगायचे आहे की भारताने जगातील पहिली डीएनए लस विकसित केली आहे. हे 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लागू केली जाऊ शकते.

- कोरोना महामारीने संपूर्ण जगाला एक धडा देखील दिला आहे की जागतिक अर्थव्यवस्था अधिक वैविध्यपूर्ण असावी. आत्मनिर्भर भारत अभियान याच गोष्टींशी संबंधित आहे. भारत एक विश्वासार्ह भागीदार बनत आहे. भारत इकोलॉजी आणि इकोनॉमी दोन्ही गोष्टींमध्ये उत्तम कार्य करीत आहे.

- प्रदूषित पाणी ही केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात आणि विशेषत: गरीब आणि विकसनशील देशांमध्ये एक मोठी समस्या आहे. भारतातील हे आव्हान पेलण्यासाठी, आम्ही 17 कोटी घरांना पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करत आहोत.

- प्रतिगामी विचारसरणीने, जे देश दहशतवादाचा राजकीय साधन म्हणून वापर करत आहेत त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की दहशतवाद हा त्यांच्यासाठी तितकाच मोठा धोका आहे.

- आपले समुद्र हे आंतरराष्ट्रीय व्यापाराची जीवनरेखा आहेत. सागरी सीमेचा गैरवापर होऊ नये. आपल्याला विस्तारवादी विचारांच्या शर्यतीतून सीमा वाचवायच्या आहेत. आम्हाला विस्तार आणि बहिष्काराच्या शर्यतीत धावण्यापासून रोखण्याची गरज आहे.

ट्वीट-

संयुक्त राष्ट्र महासभेतील 76 व्या सत्राला संबोधित करताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध मुद्यावर भाष्य करून संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.