Photo Credit- Pixabay

Tourism Boom in Jammu and Kashmir: जून २०२४ पर्यंत एक कोटीहून अधिक पर्यटकांनी जम्मू-काश्मीरला भेट दिली. संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना, गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी त्याबाबतची माहिती दिली. कलम ३७० रद्द केल्यामुळे ही पर्यटन वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. 2020 मध्ये 34,70,834 पर्यटकांनी जम्मू-काश्मीरला भेट दिली आणि तेव्हापासून या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.

2021 मध्ये ही संख्या 1,13,14,884 होती. त्यानंतर 2022 मध्ये 1,88,64,332 पर्यटकांचा टप्पा ओलांडला. गेल्या वर्षी तर ही संख्या तब्बल 2,11,24,874 वर पोहोचली होती. या वर्षी जूनपर्यंत अवघ्या सहा महिन्यात 1,08,41,009 पर्यटकांनी केंद्रशासित प्रदेशाला भेट दिली आहे. जम्मू आणि काश्मीर सरकारने नोंदवले आहे की,'पर्यटन धोरण 2020 आणि जम्मू आणि काश्मीर औद्योगिक धोरण 2021 अंतर्गत प्रोत्साहन मिळविण्यासाठी पर्यटन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा यासह पर्यटनामध्ये लक्षणीय सुधारणा करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या आहेत.' (हेही वाचा:Amarnath Yatra 2024: कडक सूरक्षेत यात्रेकरूंचा गट अमरनाथ मंदिरासाठी रवाना )

कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीत एकूणच सुधारणा झाल्यानंतर, जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या चार वर्षांपासून पर्यटकांची भरभराट होत आहे आणि यामुळे या उद्योगाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जोडलेल्या हजारो लोकांच्या उदर्निवाहाचे साधन मिळाले आहे. इतर उपायांमध्ये जम्मू आणि काश्मीर औद्योगिक धोरण- 2021 अंतर्गत केंद्रशासित प्रदेशातील पर्यटन क्षेत्राला उद्योगाची स्थिती लक्षात घेऊन प्रोत्साहन मिळणे समाविष्ट आहे.(हेही वाचा:Char Dham Yatra Halted: चार धाम यात्रा स्थगित, उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज; हवामान विभागाचा रेड अलर्ट)

पर्यटकांच्या वाढत्या संख्येला सामावून घेण्यासाठी आणि पर्यटन क्षेत्राच्या आर्थिक नफ्यातून स्थानिकांना लाभ देण्यासाठी सरकारने होमस्टे मार्गदर्शक तत्त्वे देखील अधिसूचित केली आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये सीमा पर्यटनाला वेग आला आहे आणि गुरेझ, केरन, टीतवाल आणि आर.एस. यांसारखी अज्ञात ठिकाणे पर्यटनासाठी खुली करण्यात आली आहेत. पुरा आणि अन्य ठिकाणे अॅडवेंचर आणि गोल्फ पर्यटनातही उदयास येत आहे, असे राय यांनी उत्तरात सांगितले. 'जम्मू आणि काश्मीर सरकारने पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी विविध पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेतले आहेत आणि तिसऱ्या G-20 पर्यटन कार्यगटाच्या बैठकीसारख्या मोठ्या कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केल्यानंतर ते आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून उदयास येत आहे,' असेही राय म्हणाले.

आधुनिक पायाभूत सुविधा आणि लक्झरीयस हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सची वाढती संख्या यामुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये मीटिंग्ज, परिषद आणि लग्नसोहळ्यांसारखे इतर कार्यक्रम होत आहेत. जम्मू आणि काश्मीर सरकारने नोंदवले आहे की वरील उपक्रमांमुळे, देशांतर्गत उत्पादन (GSDP) मध्ये आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 7.84 टक्के उत्पन्न मिळाले. तर आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये ते 8.47 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.