उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यात झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली. या प्रकरणातील पीडितेच्या मृत्यूनंतर देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. पीडितेवर अत्याचार करणाऱ्यां आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी सध्या देशात जोर धरत आहे. अशातचं नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या (एनसीआरबी) आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, 2012 मध्ये भारताला हादरवून सोडणार्या निर्भया सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर देशातील बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. इंडिया टुडेच्या डेटा इंटेलिजेंस युनिटने (DIU) गेल्या 10 वर्षांत राज्यानुसार बलात्काराच्या घटनांवरील डेटाचे विश्लेषण केले. डीआययूला असे आढळले आहे की, 2019 मध्ये देशातील एकूण प्रकरणांपैकी दोन तृतीयांशपेक्षा जास्त प्रकरणे 10 राज्यांमध्ये नोंदवली गेली. या 10 राज्यात उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ आदी राज्यांचा समावेश आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत गेल्या 10 वर्षात या राज्यांमध्ये परिस्थिती अधिक बिकट बनली आहे.
एनसीआरबीच्या ताज्या उपलब्ध आकडेवारीनुसार, भारतातील बलात्काराच्या एकूण घटनांपैकी पाच बलात्कार प्रकरणांपैकी चार घटना या राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, केरळ, आसाम, हरियाणा, झारखंड, ओडिशा आणि दिल्ली या 10 राज्यांतील आहेत. गेल्या 10 वर्षांत या 10 राज्यात बलात्काराच्या एकूण घटनांची संख्या जवळजवळ दुप्पट झाली आहे. यात 2009 मध्ये 12,772 वरून 2019 मध्ये 23,173 घटना इतकी वाढ झाली आहे. देशातील उर्वरित 26 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये गेल्या 10 वर्षांत बलात्काराच्या घटनांमध्ये काही विशेष बदल झालेला नाही. (हेही वाचा - Hathras Gangrape Case: हाथरस प्रकरणाची होणार सीबीआय चौकशी; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आदेश)
दरम्यान, गेल्या दहा वर्षांत भारतातील महिलांवरील बलात्काराचे प्रमाण सरासरीपेक्षा चारपट वाढले आहे. 2009 मध्ये, वरील दहा राज्यांमध्ये दररोज सुमारे तीन महिलांवर बलात्काराच्या घटना घडल्या. 2019 मध्ये या 10 राज्यांमधील हा आकडा तीनवरून 11 पर्यंत वाढला. राजस्थानमध्ये गेल्या दहा वर्षांत बलात्काराच्या घटनांमध्ये 295 टक्के वाढ झाली आहे. देशातील इतर राज्याच्या तुलनेत ही सर्वात वाईट परिस्थिती आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार 2009 मध्ये राजस्थानमध्ये बलात्काराच्या 1,519 घटनांची नोंद झाली. 2019 मध्ये ही आकडेवारी 5,997 घटनांमध्ये वाढली आहे.
या यादीमध्ये केरळ दुसर्या क्रमांकावर आहे. केरळमध्ये गेल्या दहा वर्षांत बलात्काराच्या घटनांमध्ये 256% वाढ झाली आहे. 2009 मध्ये केरळमध्ये बलात्काराच्या 568 घटनांची नोंद करण्यात आली. यात 2019 मध्ये 1,455 घटना घडल्या असूत यात वाढ 2,023 इतकी वाढ झाली आहे.
देशातील महिलांसाठी तिसरे असुरक्षित राज्य दिल्ली -
महिलांमधील तिसरे सर्वात असुरक्षित राज्य म्हणजे दिल्ली. गेल्या दहा वर्षांत देशाची राजधानी दिल्लीत बलात्काराच्या घटनांमध्ये 167 % म्हणजे तीन पट वाढ झाली आहे. 2009 मध्ये दिल्लीमध्ये बलात्काराच्या 469 घटना घडल्या असून 2019 मध्ये यात 1,253 इतकी वाढ झाली आहे. याशिवाय शेजारच्या हरियाणा राज्यात गेल्या दहा वर्षांत बलात्काराच्या घटनांची संख्या दुपटीने वाढली आहे. या कालावधीत राज्यात बलात्काराच्या घटनांमध्ये 145 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2009 मध्ये हरियाणामध्ये बलात्काराच्या 603 घटना नोंदविण्यात आल्या. तसेच 2019 मध्ये यात 1,480 इतकी वाढ झाली आहे. याशिवाय झारखंडमध्ये दहा वर्षांत बलात्काराच्या घटनांमध्ये 97% वाढ झाली आहे. 2009 मध्ये बलात्काराच्या 719 घटना नोंदवल्या गेल्या, ज्याl 2019 मध्ये 1,416 इतक्या वाढल्या.
उत्तर प्रदेशात 10 वर्षांत बलात्काराच्या घटनांमध्ये दुप्पट वाढ -
दरम्यान, सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात गेल्या दहा वर्षांत बलात्काराच्या घटनांमध्ये जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. 2009 मध्ये राज्यात 1,759 बलात्काराच्या घटनांची नोंद करण्यात आली होती. मात्र, 2019 मध्ये राज्यात 3,065 घटनाची नोंद करण्यात आली.
मध्य प्रदेशमध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये घट -
या 10 राज्यात मध्य प्रदेश हे एकमेव असे राज्य आहे जेथे बलात्काराच्या घटनांमध्ये 17 टक्के घट झाली आहे. मध्यप्रदेशमध्ये 2013-2018 या काळात दरवर्षी 4,000 हून अधिक बलात्काराच्या घटना घडल्या. 2019 मध्ये राज्यात 2,485 बलात्काराच्या घटना घडल्या. अन्य राज्यात, महाराष्ट्र, ओडिशा आणि आसाममध्ये गेल्या दहा वर्षांत बलात्काराच्या घटनांमध्ये अनुक्रमे 55 टक्के, 35 टक्के आणि 9 टक्के वाढ झाली.