INS Khanderi (Photo Credits-Indian Navy)

भारतीय नौदलाची (Indian Navy) दुसरी सर्वात अत्याधुनिक पाणबुडी (Submarine) आयएनएस खंदेरी (INS Khanderi) नौदलात सामील झाली आहे. आयएनएस खंदेरी ही पाण्यात शत्रूवर आक्रमण करणारी कलवारी वर्गाची दुसरी डिझेल-इलेक्ट्रिक  पाणबुडी (Diesel-Electric Submarine) आहे. आयएनएस खंदेरीला सायलेंट किलर (Scilent killer) असेही म्हणतात.नौदलाच्या ताफ्यात सामील झाल्यानंतर, शत्रू यापुढे समुद्राच्या दिशेने भारताकडे पाहू शकणार नाही. तसेच  300 किलोमीटर अंतरावर असलेल्या शत्रूंची जहाजे नष्ट करण्याची क्षमता आयएनएस खंदेरी पाणबुडीत आहे.

आयएनएस खंदेरी पाणबुडीचे वैशिष्ट-

खंदेरी भारतीय समुद्री सीमेचे रक्षण करण्यास पूर्णपणे सक्षम आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानासह टॉरपेडो आणि अँटिशिप क्षेपणास्त्र लॅश खंदेरी मध्ये तैनात केले जाणार आहे. पाण्यातील कोणतेही युद्धनौका नष्ट करण्याची क्षमता खंदेरी पाणबुडीत आहे. खंदेरी 45 दिवस पाण्याखाली राहू शकते. ही पाणबुडी एका तासामध्ये सहजपणे 35 किलोमीटर अंतर व्यापू शकते. 67 मीटर लांबी, 6.2 मीटर रुंद आणि 12.3 मीटर उंच या पाणबुडीचे वजन 1550 टन आहे. यात 36 पेक्षा अधिक सैनिक या पाणबुडीत राहू शकतात. पाण्यात शत्रुंना टक्कर देणारी खंदेरी समुद्राच्या 300 मीटर खोलीपर्यंत जाऊ शकते. हे देखील वाचा- आता समुद्रात वाढणार भारताची ताकद, ताफ्यात सामील होणार 24 MH60 रोमिओ सी हॉक हेलिकॉप्टर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडावरुन या पाणबुडीला खंदेरी असे नाव देण्यात आले आहे. खंदेरी गड चारी दिशानी पाण्याने वेढलेला आहे. यामुळे या पाणीबुडीला खंदेरी नाव दिले गेले आहेत. भारत नौदलात आपले वर्चस्व निर्माण करत असल्याचे दिसत आहेत. भारतात प्रथम स्कॉर्पिनय श्रेणीतील पाणबुडी आयएनएस कलवरी 2017 मध्ये नौदलात दाखल केली होती. याची निर्मिती फ्रांन्सच्या मदतीने करण्यात आली. तर मुंबईतील माझगाव डॉकयार्ड लिमिटेड द्वारे याप्रकारच्या पाच पाबुड्यांची निर्मिती केली जात आहे. या सर्व पाणबुड्या 2020 पर्यंत नौदलात दाखल करण्यात याव्यात याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे.