Jagannath Rath Yatra 2024: सनातन धर्मात जगन्नाथ रथयात्रे (Jagannath Rath Yatra) ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मान्यतेनुसार, रथयात्रा काढून भगवान जगन्नाथ यांना प्रसिद्ध गुंडीचा माता मंदिरात नेले जाते, जेथे भगवान 7 दिवस विश्रांती घेतात. यावेळी गुंडीचा माता मंदिरात विशेष तयारी केली जाते आणि मंदिराच्या स्वच्छतेसाठी इंद्रद्युम्न सरोवरातून पाणी आणले जाते. यानंतर भगवान जगन्नाथाचा परतीचा प्रवास सुरू होतो. या यात्रेचे सर्वात मोठे महत्त्व म्हणजे संपूर्ण भारतभर ती एखाद्या सणाप्रमाणे काढली जाते.
भगवान जगन्नाथ रथयात्रा आषाढ शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी सुरू होते. भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेला 7 जुलैपासून म्हणजेच आजपासून सुरुवात झाली आहे. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू या सोहळ्यात सहभागी झाल्या आहेत. रथयात्रेत भगवान जगन्नाथ वर्षातून एकदा मंदिरातून बाहेर पडतात. रथयात्रेत ताल ध्वज समोर असतो ज्यावर श्री बलराम असतात. त्यामागे पद्मध्वज असतो ज्यावर सुभद्रा आणि सुदर्शन चक्र असते आणि शेवटी गरूण ध्वज असतो. (हेही वाचा - Ashadhi Wari 2024 Special Trains: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वे पंढरपूर आणि मिरजसाठी चालवणार 64 गाड्या; वाचा सविस्तर)
पहा व्हिडिओ -
President Smt Droupadi Murmu ji visits Puri for the auspicious Lord Jagannath Rath Yatra today.
Her presence celebrates the strength of women in India, leading by example in spirituality and leadership. #WomenEmpowerment #jagannathrathyatra2024 pic.twitter.com/QSm8msNKqb
— Satya Kumar Yadav (@satyakumar_y) July 7, 2024
भगवान जगन्नाथ आपल्या मावशीच्या घरी का राहतात?
पद्म पुराणानुसार, भगवान जगन्नाथ यांच्या बहिणीने एकदा हे शहर पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. मग जगन्नाथ आणि बलभद्र आपली प्रिय बहीण सुभद्राला घेऊन रथावर बसले आणि नगर दाखवायला निघाले. यावेळी ते गुंडीचा येथे मावशीच्या घरीही गेले आणि सात दिवस येथे राहिले. तेव्हापासून जगन्नाथ यात्रा काढण्याची परंपरा सुरू आहे. नारद पुराण आणि ब्रह्म पुराणातही याचा उल्लेख आहे. मान्यतेनुसार, देव आपल्या मावशीच्या घरी आपल्या भावा-बहिणींसोबत भरपूर पदार्थ खातात आणि मग ते आजारी पडतात. त्यानंतर त्याच्यावर उपचार केले जातात आणि बरे झाल्यावरच ते लोकांना दर्शन देतात.
जगन्नाथ रथयात्रा -
भगवान जगन्नाथाचे मुख्य निवासस्थान ओडिशातील पुरी आहे. पुरीला पुरुषोत्तम पुरी असेही म्हणतात. राधा आणि श्री कृष्णाच्या युगल मूर्तीचे प्रतीक स्वतः श्री जगन्नाथ आहेत. म्हणजेच राधा-कृष्णाच्या संयोगाने त्यांचे स्वरूप निर्माण झाले आहे आणि कृष्णही त्यांचाच एक अंश आहे. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या अर्ध-तयार लाकडी मूर्ती ओडिशात स्थापित केल्या आहेत. या मूर्ती महाराज इंद्रद्युम्न यांनी तयार केल्या होत्या.