प्रशांत किशोर यांना लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेज प्रताप यादव यांच्याकडून ऑफर म्हणाले 'जेडीयूत या! तुमच्यासाठी पक्षाची दारे खुली'
Prashant Kishor, Tej Pratap Yadav | (Photo credit: archived, edited, symbolic images)

राष्ट्रीय जनता दल (RJD) सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांचे थोरले चिरंजीव तेज प्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांनी प्रसिद्ध राजकीय रणनितीकार प्रशात किशोर (Prashant Kishor) यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. प्रशांत किशोर आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्यात नुकतेच मतभेद निर्माण झाले. परिणामी नीतीश कुमार यांनी प्रशांत किशोर यांना संयुक्त जनता दल (Janata Dal United) पक्षातून बाहेर घालवले. हिच संधी साधत तेज प्रताप यादव यांनी प्रशांत किशोर यांना ऑफर दिली आहे. तसेच, नीतीश कुमार यांच्यावर जोरदार टीका करत त्यांनी केवळ किशोर यांचा वापर करुन घेतला असे म्हटले आहे.

तेज प्रताप यादव यांनी म्हटले आहे की, स्वत:ची इच्छा असेपर्यंत नीतीश कुमार यांनी प्रशांत किशोर यांचा वापर करुन घेतला. त्यानंतर त्यांनी किशोर यांना बाहेरचा रस्ता दाखवला. परंतू, नीतीश कुमार यांना येत्या काळात बिहारची जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. तेज प्रताप यांनी प्रशांत किशोर यांना ऑफर देताना म्हटले आहे की, प्रशांत किशोर यांचे राजदमध्ये स्वागतच आहे. त्यांच्यासाठी आमच्या पक्षाचे दरवाजे नेहमीच उघडे आहेत.दरम्यान, या आधी प्रशांत किशोर यांनी म्हटले होते की, ते येत्या 11 फेब्रुवारीनंतर भविष्यातील निर्णयाबाबत सांगतील आणि दिशाही स्पष्ट करतील. तोपर्यंत या सर्व गोष्टींवर आपण कोणतेही भाष्य करणार नाही, असे किशोर यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, बिहार काँग्रेसकडून पोस्टरबाजीत जातियवादाचं संतापजनक प्रदर्शन)

प्रशांत किशोर यांनी 2018 मध्ये अधिकृतपणे संयुक्त जनता दलात प्रवेश केला. त्यांचा प्रवेश होताच नीतीश कुमार यांनी त्यांना पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून घोषीत केले. त्यामुळे संयुक्त जनात दलात प्रशांत किशोर यांचे स्थान नितीश कुमार यांच्यानंतर पहिल्या म्हणजेच दुसऱ्या क्रमांकाचे मानले जाऊ लागले. महत्त्वाचे म्हणजे प्रशांत किशोर यांनी संयुक्त जनता दलात प्रवेश केला तेव्हा, नीतीश कुमार यांनी म्हटले होते की, प्रशांत किशोर हेच पक्षाचे भविष्य आहेत. त्यामुळे पक्षात अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या चिंतेच भर पडली होती. यात जेडीयूचे वरिष्ठ नेते आरसीपी सिंह यांचेही नाव होते. कारण त्यांना रिप्लेस करुन त्यांच्या जागी प्रशांत किशोर यांचा उजवा हात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लल्लन सिंगह यांना त्यांची जागा देण्यात आली होती.