Noida Thar Stunt Video: रस्त्यांवरच्या अपघाताची मालिका सुरुच असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नोएडामधील एमिटी युनिव्हर्सिटीजवळ बेशिस्तपणे आणि बेफामपणे स्टंट करत थार चालवत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच, पोलिसांनी थार चालकावर कारवाई केली आहे. थार चालक स्टंट करत युनिव्हर्सिटीच्या परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये भिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. या घटनेनंतर रस्त्यावर बराच वेळ गोंधळ निर्माण झाला होता. (हेही वाचा- मध्यप्रदेशमध्ये नदीत बुडून 3 मुलांचा मृत्यू, SDRF च्या पथकाने दोन मुलांचे मृतदेह बाहेर काढले;
मिळालेल्या माहितीनुसार, २४ मे रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. ज्यात थार चालक एमिटी युनिवर्सिटी सेक्टर १२५ नोएडा रोड वर खतरनाक पध्दतीने स्टंट करत विद्यार्थ्यांना धडक देण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भिती निर्माण झाली. व्हिडिओ व्हायरल होताच, सेक्टर १२६ मध्ये FIR दाखल करण्यात आला. या घटनेनंतर जैतपूर पोलिसांनी थार चालक प्रिंस मावीला (२५) अटक केले. स्टंट करण्यात आलेल्या थारला देखील पोलिसांनी जप्त केले आहे.
HR30Z4504 नंबर की काले शीशों की यह गाडी नोएडा अमेटी युनिवर्सिटी के पास खतरनाक स्टंट करके आए दिन लोगों की जान जोखिम में डालती है।’गुर्जर’ लिखकर लड़कियों को छेड़ने और परेशान करने वाले ऐसे असामाजिक तत्व समाज का नाम भी खराब करते है।@Uppolice @noidapolice आपसे कारवाई की उम्मीद है। pic.twitter.com/VOnJ8nM72y
— Gaurav Nagar (@gauravnagar_) May 24, 2024
व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, थारच्या नंबर प्लेटवर 'गुजर' लिहलले आहे. युनिव्हर्सिटीच्या परिसरात बेफामपणे थार चालवत विद्यार्थ्यांना धडक दिली. ट्रॉफिक पोलिसांनी या घटनेअंतर्गत थार चालकाकडून ३५,००० चलन जारी करण्यात आले. एवढं नाही तर रॅश ड्रायव्हींग, लोकांचे नुकसान करणे आणि पर्यावरणास धोका निर्माण करणे यासाठी ई-चलान देखील जारी केले आहेत. या व्हिडिओवर अनेक युजर्संनी संताप व्यक्त केला आहे. काही जणांनी हा व्हिडिओ X वर अपलोड करून नोएडा पोलिसांना टॅग केले आहे.