Drowning | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Children Died Due To Drowning In The River: मध्यप्रदेशातील नालखेडा (Nalkheda) येथे शुक्रवारी वाहणाऱ्या लाखुंदर नदीत आंघोळ करताना तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. मुले बुडाल्याची माहिती गावकऱ्यांना मिळताच शेकडो ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले आणि त्यांनी मुलांचा शोध सुरू केला. त्यानंतर गावकऱ्यांनी एसडीआरएफ टीम (SDRF Team) ला माहिती दिली, माहिती मिळताच एसडीआरएफ टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी दोन मुलांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले. मुलीचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आगर जिल्ह्यातील नालखेडा अंतर्गत येणाऱ्या छल्डा गावात नदीत आंघोळीसाठी गेलेल्या तीन मुलांचा नदीत बुडून मृत्यू झाला. याची माहिती ग्रामस्थांनी आगर एसडीआरएफ टीमला दिली. माहिती मिळताच आगर एसडीआरएफ प्लाटून कमांडर कविता सोलंकी आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोन मुलांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले. (हेही वाचा -Faridabad Businessman Family Suicide Case: फरीदाबादमध्ये 6 जणांचा आत्महत्येचा प्रयत्न, कर्जाच्या दबावातून व्यापारी कुटुंबाने कापल्या हाताच्या नसा)

अल्पवयीन मुलीच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. पंकज (वय 7-8 वर्षे) रहिवासी लातुरी गेहलोत आणि मोनू (वय 7-8 वर्षे, छल्रा येथील रहिवासी, यांचे मृतदेह पथकाने नदीतून बाहेर काढले आहेत. दरम्यान, मुस्कान (वय 8 वर्षे) छल्दा गावातील रहिवासी असलेल्या मुलीच्या मृतदेहाचा शोध बचाव पथकाकडून सुरू आहे.