देशात महिलांवर होणारे अत्याचार आणि बलात्काराचे (Rape) सत्र सुरुच आहे. देशातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. अशातच कर्नाटकच्या (Karnataka) म्हैसूर (Mysuru) येथून सर्वांना हादरून टाकरणी घटना उघडकीस आली आहे. चामुंडी डोंगर परिसरात मित्रासोबत फिरायला गेलेल्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार (Gangrape) केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. एवढेच नव्हेतर, पीडित मुलीच्या मित्रालाही नराधमांनी बेदम मारहाण केल्याचे समजत आहे. पीडितेला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच या घटनेतील आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी उत्तर प्रदेशची रहिवाशी असून अभ्यासासाठी ती म्हैसूरला आली होती. ती एका खासगी महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, पीडित मुलगी मंगळवारी तिच्या मित्रासोबत म्हैसरमधील चामुंडी डोंगर परिसरात फिरायला गेली होती. मात्र, घरी परतत असताना या दोघांना आरोपींनी डोंगराच्या पायथ्याशी अडवले. तसेच पीडिताच्या मित्राकडे पैसे मागू लागले. मग आरोपींनी या दोघांना निर्जन स्थळी घेऊन गेले. त्यानंतर आरोपींनी विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला. तसेच तिच्या मित्रालाही बेदम मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. हे देखील वाचा- Child Porn: लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी एकास अटक, तामिळनाडूच्या मदुराई येथील प्रकार
पीडितेला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. या घनटेनंतर संपूर्ण देशात संतापजनक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. महत्वाचे म्हणजे, या घटनेला 24 तास उलटून गेले असून अद्यापही आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.