चाइल्ड पॉर्न (Child Porn) बनवणे, पाहणे, फॉरवर्ड करणे आणि त्याला प्रोत्साहन देणे कायद्याने गुन्हा असतानाही वारंवार अशाप्रकारच्या घटना समोर येत आहेत. यातच तामिळनाडूच्या (Tamil Nadu) मदुराईतील (Madurai) एका जिल्ह्यातील एका व्यक्तीला चाईल्ड पॉर्न व्हिडिओ शेअर केल्याच्या आरोपाखाली अटक झाली आहे. आरोपीने 29 मे रोजी व्हाट्सअप आणि इमेलच्या माध्यमातून ऑनलाईन चाईल्ड व्हिडिओ शेअर केला होता. यासंदर्भात एनसीआरबीने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला बेड्या ठोकल्या आहेत.
टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, सरकार संचालित एनसीआरबीने नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्सप्लोयटेड चिल्ड्रनच्या अहवालाच्या आधारे चाईल्ड पोर्नोग्राफी शेअर करणाऱ्या आरोपींबाबत पोलिसांना माहिती दिली. या माहितीच्या आधारे मदुराई पोलिसांच्या मानव तस्करीविरोधी युनिटने तपास सुरू केला. त्यानंतर आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्याविरोधात माहिती तंत्रज्ञान कायदा आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याविरुद्ध पेरुंगुडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. हे देखील वाचा- Ludhiana Rape: 38 वर्षीय महिलेवर बलात्कार आणि ब्लॅकमेल केल्याप्रकरणी जिम मालकाविरोधात गुन्हा दाखल
चाइल्ड पोर्नोग्राफी रोखण्यासाठी केंद्र सरकारने कडक कायदे केल्यानंतर, त्याबाबत धडक कारवाया सुरू आहेत. चाइल्ड पॉर्न व्हिडीओ किंवा त्यासंबंधित कोणता व्हिडीओ, फोटो कुणाला पाठवला तर संबंधितास तुरुंगात जावे लागू शकते. चाइल्ड पॉर्न बनवणे, पाहणे, फॉरवर्ड करणे आणि त्याला प्रोत्साहन देणे भारतात कायद्याने गुन्हा आहे. असे असूनही वारंवार अशा घटना घडत आहेत.
गेल्या वर्षी मदुराईमध्ये एका 40 वर्षीय व्यक्तीला त्याच्या अकाऊंटद्वारे सोशल नेटवर्किंग साइट्सवर लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो अपलोड केल्याबद्दल अटक करण्यात आली होती.