Lucknow Hotels Receive Bomb Threats: लखनौ (Lucknow) मधील अनेक मोठ्या हॉटेलांना बॉम्बच्या धमक्या (Bomb Threats) मिळाल्या आहेत. ईमेलद्वारे हॉटेल्स बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी देणाऱ्या व्यक्तीने 55 हजार डॉलर्सची मागणीही केली आहे. मेलनुसार, ही धमकी लखनऊच्या हॉटेल फॉर्च्युन (Hotel Fortune), हॉटेल लेमन ट्री (Hotel Lemon Tree), हॉटेल मॅरियट (Hotel Marriott), साराका हॉटेल (Saraka Hotel), पिकाडिली हॉटेल, कम्फर्ट हॉटेल व्हिस्टा, फॉर्च्यून हॉटेल, लेमन ट्री हॉटेल, क्लार्क अवध हॉटेल, हॉटेल कासा, दयाल गेटवे हॉटेल आणि हॉटेल यांना पाठवण्यात आली.
धमकी देणाऱ्या व्यक्तीने मेलमध्ये लिहिले की, 'हॉटेलच्या तळमजल्यावर काळ्या पिशव्यांमध्ये बॉम्ब लपवण्यात आले आहेत. मला 55,000 डॉलर्स हवे आहेत, अन्यथा मी बॉम्बचा स्फोट करीन आणि सर्वत्र रक्तपात होईल. बॉम्ब निकामी करण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास त्यांचा स्फोट होईल.' गेल्या अनेक महिन्यांपासून देशभरातील उड्डाणे, शाळा, महाविद्यालये आणि हॉटेलांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या येत आहेत. (हेही वाचा -Rajkot Bomb Threat: गुजरात राज्यातील राजकोटमध्ये 10 मोठ्या हॉटेल्सला बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलीसांकडून तपास सुरू)
तिरुपतीमधील हॉटेलांनाही धमक्या -
काही दिवसांपूर्वी तिरुपतीमधील अनेक हॉटेलांना बॉम्बच्या धमकीचे ईमेलही आले होते. या ईमेलमध्ये ड्रग स्मगलिंग नेटवर्कचा कथित नेता जाफर सादिक याच्या नावाचा उल्लेख आहे, ज्याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि ईडीने अटक केली होती. धमक्यांना प्रत्युत्तर म्हणून, पोलिस आणि स्निफर कुत्र्यांनी हॉटेल्सची व्यापक झडती घेतली. मात्र, ही धमकी फसवी असल्याचे स्पष्ट झाले. (हेही वाचा - Fresh Bomb Threats To 25 Flights: बॉम्ब धमक्यांचे सत्र काही थांबेना! 25 हून अधिक फ्लाइट्सला बॉम्बची धमकी)
आकासा एअरलाईन्समध्ये बॉम्बची अफवा -
दरम्यान, आज आकासा फ्लाइटला बॉम्बची धमकी मिळाली होती. परंतु, ही बातमी निव्वळ अफवा ठरली. बॉम्बची माहिती मिळाल्यानंतर सर्व प्रवाशांना विमानातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. ज्या फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली ते विमान बेंगळुरूहून अयोध्येला आले होते. फ्लाइटमध्ये एकूण 173 प्रवासी होते. बॉम्बच्या धमकीमुळे आकासा एअरलाईन्सचे विमान महर्षी वाल्मिकी विमानतळावर सुरक्षित उतरले.