रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikant Das) यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांसोबत एक महत्त्वाची बैठक (Meeting) बोलावली आहे. मुंबईत (Mumbai) ही बैठक सुरू आहे. या बैठकीत सर्व बँकांच्या पत वाढीची स्थिती आणि मालमत्तेची गुणवत्ता यावर चर्चा केली जाईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरबीआय सर्व बँकांना हळूहळू व्याजदर वाढवण्याचे निर्देश देऊ शकते. आरबीआयच्या रेपो दरात वाढ करण्याच्या घोषणेनंतर बँकेने कर्जदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ही बैठक बोलावण्यात आली आहे. मे महिन्यात अचानक झालेल्या एमपीसीच्या बैठकीत आरबीआयने रेपो दरात 40 बेसिस पॉइंट्स किंवा 0.40 टक्के वाढ केली होती.
बँकांनी त्यांचे कर्जदर वाढवावेत, पण त्यांनी जास्त आक्रमक होऊ नये, अशी मध्यवर्ती बँकेची इच्छा आहे. कर्ज दरांचा नकारात्मक परिणाम खाजगी भांडवली खर्च आणि उपभोग आणि मागणीवर होऊ नये अशी मध्यवर्ती बँकेची इच्छा आहे. महितीनुसार कर्जाच्या दरात वाढ झाल्यामुळे उपभोगाची मागणी आणि खाजगी भांडवल संपुष्टात येते. त्यामुळे आरबीआयने ही अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. (हे देखील वाचा: दिलासादायक! एप्रिलमध्ये 88 लाख लोकांना मिळाला रोजगार; कोरोना महामारीनंतर एका महिन्यात सर्वाधिक नोकऱ्या मिळाल्या)
जूनमध्ये व्याजदरात वाढ अपेक्षित
तसेच एमपीसीच्या जूनमध्ये होणाऱ्या पुढील बैठकीत रेपो दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ऑगस्टमध्ये होणाऱ्या बैठकीत रेपो दरातही वाढ होऊ शकते. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी जगभरातील बँकांनी कर्जदरात वाढ केली आहे. ऑगस्ट 2018 नंतर पहिल्यादां रोपो रेट वाढवण्यात आला.