पीएम नरेंद्र मोदी और प्रियंका चोपड़ा (Photo Credits: Instagram)

बिहार मधील अरवाल जिल्ह्यात कोविड-19 (COVID-19) डेटामध्ये मोठी तफावत आढळून आली आहे. जिल्ह्यातील लस घेणाऱ्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी, अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर मोठ्या डेटा फ्रॉडचा पर्दाफाश झाला आणि प्रशासन कारवाईत आले. यानंतर त्यावेळी 2 संगणक परिचालकांना निलंबित करण्यात आले होते. NDTV च्या रिपोर्टनुसार, नुकतीच करपी कम्युनिटी हेल्थ सेंटरमधून लस घेतलेल्या लोकांच्या यादीची तपासणी करण्यात आली ज्यामध्ये अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा, पीएम मोदी, प्रियांका चोप्रा यांसारख्या प्रसिद्ध लोकांच्या नावाच्या अनेक लोंकाची नोंद दिसली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासनालाही याचा पैच सहन करावा लागला, त्यानंतर तातडीने चौकशीचे आदेश देण्यात आले.

जिल्हा दंडाधिकारी जे प्रियदर्शनी म्हणाले की, "ही गंभीर बाब आहे आणि आम्ही चाचणी आणि लसीकरण वाढवण्याचे काम करत असताना, असा निष्काळजीपणा खपवून घेतला जाऊ शकत नाही. केवळ टिकाकरण नाही तर आम्ही सर्व आरोग्य केंद्रांवर चौकशी करू, एफआयआर नोंदवला जाईल." आणि योग्य कारवाई केली जाईल. (हे ही वाचा Omicron Variant: महाराष्ट्रानंतर गुजरातमध्येही ओमिक्रॉनचा शिरकाव, एकाच घरातील 9 सदस्यांना लागण.)

या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आरोग्यमंत्री मंगल पांडे यांनी सांगितले. ते म्हणाले की डेटा फ्रॉडची ही दुसरी घटना आहे जिथे दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्या लोकांच्या नावे दोन डोस आधीच घेतले गेले आहेत.