Nitin Gadkari (Photo Credits-ANI)

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान (Coronavirus) आहे. त्यामुळे दिवसागणिक रुग्णांसह बळींचा आकडा वेगाने वाढत आहे. तसेच सरकारने येत्या 30 जून पर्यंत लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याची घोषणा केली आहे. दुसऱ्या बाजूला सरकारसह कोविड वॉरिअर्ससुद्धा कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. तसेच भारतासह अन्य देशातील वैज्ञानिक सुद्धा कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी लसीचा शोध लावत आहेत. मात्र देशाला लवकरच कोरोनासंबंधित लस वैज्ञानिकांकडून उपलब्ध करुन देण्यात येईल असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन निडकरी (Nitin Gadkari) यांनी म्हटले आहे.

गुजरात जन संवाद रॅलीच्या वेळी नितीन गडकरी यांनी असे म्हटले आहे की, कोरोना व्हायरसचे संकट फार काळ टिकून राहणार नाही. आपल्या वैज्ञानिकांसह अन्य देशातील वैज्ञानिक सुद्धा दिवसरात्र कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी लसी बाबत संशोधन करत आहेत. त्यामुळे आपल्याला लवकरच कोरोनावर लस उपलब्ध होईल असे ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.(Coronavirus & Patanjali: कोरोना व्हायरस पतंजली औषधाने बरा? चाचणी 100% अनुकूल आल्याचा आचार्य बालकृष्ण यांचा दावा; रामदेव बाबा यांचाही दुजोरा)

दरम्यान, भारतातील कोरोनाच्या परिस्थिती बद्दल बोलायचे झाल्यास आकडा 3,20,922 वर पोहचला असून एकूण 9195 जणांचा बळी गेला आहे. तसेच अद्याप 1,49,348 जणांवर उपचार सुरु असून 162379 जणांची प्रकृती सुधारल्याची माहिती देण्यात आले आहे. सरकारने लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात नियमात शिथीलता दिली आहे. परंतु काही गोष्टी सुरु केल्यानंतर नागरिकांची रस्त्यांवर गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.