Acharya Balkrishna, Baba Ramdev | (Photo Credits: Pixabay | Archived, edited, symbolic images)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचा अवघे जग सामना करत आहे. जगभरातील संशोधक कोरोना व्हायरस संकटावर उपचार करण्यासाठी संशोधन करत आहेत. अद्यापही कोरोनावर कोणत्याही प्रकारचा उपचार, लस अथवा औषध मिळाले नाही. दरम्यान, पंतजलि सीईओ (CEO Patanjali) आचार्य बाळकृष्ण  (Acharya Balkrishna) यांनी मात्र पतंजलिचे औषध घेतल्यामुळे कोरोना रुग्ण 4 ते 14 दिवसांच्या कालावधीत बरे झाल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे योगगुरु रामदेव बाबा (Baba Ramdev) यांनीही या आचार्य बाळकृष्ण यांच्या दाव्याला दुजोरा दिला आहे. पतंजलि (Patanjali) निर्मित औषध घेतल्यावर कोरना पॉझिटीव्ह रुग्ण निगेटिव्ह झाले. तसेच, करोना या रोगाचा इलाज आर्युर्वेदिक औषधामुळे शक्य आहे, असेही बाळकृष्ण यांनी म्हटले आहे.

आचार्य बालकृष्ण यांनी आपल्या दाव्यात म्हटले आहे की, आम्ही अभ्यासाच्या जोरावर गंभीरातील अत्यंत गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांवर चाचण्या केल्या. 100% यश आले. आयुर्वेदाच्या माध्यमातून कोरोना व्हायरसवर उपचार शक्य आहे. वेगवेगळ्या ठिकाणांवरील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना आमचे औषध देण्यात आले. 80% रुग्ण हे 5-6 दिवसांमध्ये बरे झाले. हे औषध घेणाऱ्या कारी रुग्णांना बरे होण्यासाठी 5-6 तर काही रुग्णांना 10 ते 12 किंवा त्याहून अधिक 14 दिवसांचाही कालावधी लागल्याचे बालकृष्ण यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, 'अश्वगंधा’ कोरोनावर प्रभावी औषध ठरु शकते; IIT दिल्ली आणि जपानी संस्थेचा दावा)

दरम्यान, आचार्य बालकृष्ण यांनी पुढे बोलताना म्हटले की, या औषधाच्या अधिक प्रकटीकरणासाठी आम्ही एक क्लीनिकल कंट्रोल ट्रायलही करत आहोत. ज्याच्या आधारावर आम्ही 4 ते 5 दिवसांमध्ये संपूर्ण तपशीलासह अवघ्या जगाला सांगू की पतंजलिने कोरोना व्हायरस नियंत्रणात आणणारे औषध शोधले आहे.