Smriti Irani on Rahul Gandhi: हाथरस मधील सामूहिक बलात्कार प्रकरणी युपी मधील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर सर्वांकडून सडकून टिका केली जात आहे. याच पार्श्वभुमीवर काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi), प्रियंका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi Vadra), रणपीज सिंह सुजरेवाला (Randeep Singh Surjewala) यांनी या बद्दल मोर्चा काढल्याचे दिसून आले. राहुल गांधी पुन्हा एकदा हाथरसला जाणार आहेत. याच कारणास्तव आता केंद्रीय मंत्री स्मृति ईरानी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. स्मृति ईरानी यांनी असे म्हटले आहे की, ते न्याय देण्यासाठी नव्हे तर राजकरणासाठी तेथे जात आहेत.(Hathras Case: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यावेच'; दिल्लीतील इंडिया गेट येथे सुरु असलेल्या आंदोलनाच्या वेळी भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांची मागणी)
राहुल गांधी यांचे आज हाथरसला जाणे हे राजकरण असल्याचे लोकांना समजते असे स्मृति इराणी यांनी म्हटत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच न्यायासाठी त्यांची ही कूच नाहीच आहे. यापु्र्वी राहुल गांधी यांनी असे म्हटले होते की, जगातील कोणतीच शक्ती मला हाथरस मधील या दु:खी परिवाराला भेटण्यापासून रोखु शकत नाही.(Hathras Case: हाथरस घटना प्रकरणी सीएम योगी आदित्यनाथ सरकारची मोठी कारवाई; एसपी, डीएसपी, इन्स्पेक्टर आणि इतर अधिकाऱ्यांना केले निलंबित)
जनता ये समझती है कि उनकी(राहुल गांधी) हाथरस की तरफ कूच राजनीति के लिए है, इंसाफ के लिए नहीं: राहुल गांधी के आज हाथरस जाने पर केंद्रीय मंत्री स्मृति ईरानी #HathrasCase pic.twitter.com/gnyAMPjT9R
— ANI_HindiNews (@AHindinews) October 3, 2020
दरम्यान, प्रियंका गांधी यांनी हाथरस प्रकरणी पुन्हा एकदा योगी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी असे म्हटले की, युपी सरकार नैतिक स्वरुपाने भ्रष्ट आहे. पीडितेला उपचार मिळाला नाही, योग्य वेळी तक्रार दाखल केली गेली नाही, मृतदेह जबरदस्तीने जाळण्यात आला, परिवार बंदीत आहे, त्यांना दाबले जात आहे. त्यानंतर आता परिवाराला धमकी दिली जात आहे की, त्यांची नार्को टेस्ट होणार आहे. हा व्यवहार देशाला मान्य नाही. पीडितेच्या परिवाराला धमकावणे बंद करा.