File image of Bhim Army Chief Chandrashekhar Azad | (Photo Credits: PTI)

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील 19 वर्षीय मुलीवर करण्यात आलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यावेच अशी मागणी भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी केली आहे. चंद्रशेखर आझाद यांच्या पक्षाकडून दिल्लीतील इंडिया गेट येथे आंदोलन सुरु असताना त्यांनी हे विधान केले आहे. तसेच उत्तर प्रदेशातील भाजप प्रणित सरकारवर ही टीका केली.(Hathras Gangrape Case: माता-बहिणींच्या स्वाभिमानाला धक्का लावणार्‍यांची गय करणार नाही, दोषींची शिक्षा भविष्यात उदाहरण सिद्ध होईल: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ)

हाथरस मधील पीडितेचा मंगळवारी मृत्यू झाला. दोन आठवड्यांपूर्वी पीडितेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर बुधवारी पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार उत्तर प्रदेशातील पोलिसांकडून करण्यात आले. मात्र आपल्या मुलीच्या अंत्यसंस्कारावेळी परिवारालाच तेथे उपस्थितीत राहण्याची परवानगी सुद्धा देण्यात आली नाही.

आझाद यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून असे म्हटले आहे की, आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी अद्याप का मौन धरले आहे? त्यांचे शांत बसणे हेच धोकादायक असल्याचे ही चंद्रशेखर आझाद यांनी म्हटले आहे.(Hathras Case: केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले करणार हाथरस चा दौरा; आरोपींना फाशी देण्याची मागणी)

त्याचसोबत उत्तर प्रदेशाने त्यांना निवडून देत संसदेत पाठवले आहे. पण हाथरस मधील प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे. तिच्यावर बलात्कार करण्यासह हत्या ही करण्यात आली. तिचे अवयव तुटलेले आणि मृतदेह कचऱ्याच्या अवस्थेसारखा झाला होता. तर उत्तर प्रदेशात मानवी हक्कांचे उल्लंघन केले जात आहे तर मोदी यावर एक शब्द सुद्धा बोलू शकत नाहीत? असा सवाल ही आझाद यांनी उपस्थितीत केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पीडितेचा किंवा तिच्या परिवाराचा आक्रोश दिसत नाही आहे. अजून किती वेळ शांत बसणार आहात? तुम्हाला उत्तर द्यावेच लागेल. आज संध्याकाळी आम्ही उत्तराची मागणी करत आहोत. तुमची शांततचा आमच्या मुलींसाठी धोकादायक आहे.

चंद्रेशेखर आझाद यांनी जतंर मतंर येथे पुन्हा आंदोलन संध्याकाळपासून सुरु केले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, मी हाथरसचा दौरा करणार आहे. तर उत्तर प्रदेशातील सरकार जो पर्यंत राजीनामा देत नाही तो पर्यंत आमचा संघर्ष असाच सुरु राहणार आहे. न्याय दिला जातो. मी सुप्रीम कोर्टाला विनंती करतो की त्यांनी या प्रकरणात दखल घ्यावी.

दरम्यान, हाथरस गॅंगरेप प्रकरणानंतर पुन्हा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर  19 वर्षीय मुलीवर 4 जणांनी बलात्कार करून तिची हत्या करण्याच्या प्रयत्नात जबर जखमी झालेल्या मुलीचा उपचारादरम्यान दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील या घटनेचा देशभरातून निषेध करण्यात आला. तर 30 सप्टेंबरला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या सामुहिक बलात्कार प्रकरणी चौकशीसाठी 3 सदस्यीय SIT समिती नेमली आहे. तसेच त्यांना 7 दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.