Home Quarantine असलेल्या Rahul Gandhi यांचा मोदी सरकार वर ट्वीट करत निशाणा; 'देशाला खोटे उत्सव, पोकळ भाषण नव्हे 'समाधान' हवयं'
Rahul Gandhi (Photo Credits: PTI)

कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)  काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधित असल्याचं समजल्यानंतर त्यांनी स्वतःला सेल्फ़ क्वारंटीन करून घेतलं आहे. मात्र सोशल मीडीयात अ‍ॅक्टिव्ह असलेल्या राहुल गांधींनी आज ट्वीट करत मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. भारतात केवळ संकट कोरोनाचं (Coronavirus)  नव्हे तर सरकारची जनमाणसांविरोधी धोरणं देखील आहेत असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. खोटे उत्सव आणि पोकळ भाषणं नाही तर देशाला आता 'समाधान' हवं असल्याचं त्यांनी या ट्वीट मध्ये म्हटलं आहे. दरम्यान सध्या घरातच क्वारंटीन आहे आणि सातत्याने वाईट बातम्याच येत आहेत असं म्हणत त्यांनी हतबलता व्यक्त केली आहे.

दरम्यान सध्या दिल्ली, महाराष्ट्र सह देशात अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोना फोफ़ावत आहे. झपाट्याने वाढत असलेल्या कोरोनारूग्णसंख्येसमोर आता देशात आरोग्ययंत्रणा कमी पडत असल्याचं चित्र आहे. काहींना अजूनही वेळेत ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड मिळण्यासाठी त्रास होत आहे तर कुठे औषधांचा तुटवडा आहे. त्यातच अनेकांचे कोविड 19 शी झुंज देताना प्राण जात असल्याने भारतात कोविड 19 मुळे पुन्हा चिंता, हतबलता वाढल्याचं चित्र आहे. (नक्की वाचा: Rahul Gandhi: पंतप्रधान झाल्यावर काय करणार? राहुल गांधी यांनी सांगितला मास्टर प्लान).

काल राहुल गांधी यांची बहीण प्रियंका गांधी वढेरा यांनी देखील व्हीसी च्या माध्यमातून बोलताना केंद्र सरकारवर टीका केल्याचं पहायला मिळालं आहे. दरम्यानच्या काळात कॉंग्रेस कडून सातत्याने देशातील कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी विविध पर्यांयाचा विचार व्हावा, लसीकरण वाढवावं, परदेशी लसी भारतात येऊ द्याव्यात याची मागणी केली जात आहे. पण त्याला केंद्र सरकारकडून मिळणारा प्रतिसाद हा फारसा स्त्युत्य नाही.