काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी म्हटले की, जर ते पंतप्रधान (Prime Minister) असते तर त्यांनी विकासदराची काळजी केली नसती. विकासदर वाढविण्यापेक्षा रोजगार कसा वाढवता येईल यावर विशेष लक्ष्य केंद्रीत केले असते, असे म्हटले आहे. अमेरिकेतील हार्वर्ड स्कूल चे राजदूत निकोलस बर्न्स यांच्यासोबत चर्चा करताता एका प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी बोलत होते. शुक्रवारी बोलताना त्यांनी सांगितले की, पंतप्रधान असेन तर मी विकासकेंद्रीत रणनितिऐवजी रोजगार निर्मितीवर अधिक लक्ष देईल. मला वाटते की, आपल्याला विकासाची आवश्यकता आहे. परंतू प्रोडक्शन आणि जॉब क्रिएशन आणि व्हॅल्यूअॅडिशन वाढविण्यासाठी अधिक काही करायला हवे.
तुम्ही जर पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून निवडून गेला तर आपण काय कराल असा प्रश्न विचारला असता राहुल गांधी बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, सध्यास्थितीत जर आम्ही आमचा विकास दर पोहिला तर आम्हाला विकास आणि जॉब क्रिएशन यांच्यात व्हॅल्यू अॅडिशन करावे लागेल, असे नाही. मी कोणत्याही चीनी नेत्याला भेटलो नाही. जो म्हणतो की, मला नोकरीची काहीच अडचण नाही. त्यांनी सांगितले की, जर मी जर नोकरीची संख्या पाहात नसेल तर मला 9 टक्क्यांच्या आर्थिक विकासात कोणतीही रुची नाही.
राहुल गांधी यानी देशातील संस्थागत प्रणालीवर सत्ताधारी पक्षाने पूर्णपणे कब्जा केल्याचा आरोप करत म्हटले की, निष्पक्ष राजकीय सामना करण्यासाठी लोकशाही प्रणातील संस्था योग्य जबाबदारी पार पाडत नाहीत. राहुल गांधी यांनी अमेरिकेच्या प्रसिद्ध शिक्षण संस्था हार्वर्ड कॅनडी स्कूल येथील विद्यार्थ्यांशी ते ऑनलाईन संवाद साधत होते या वेळी त्यांनी असम विधानसभा निवडणुकीदरम्यान, एका भाजप उमेदवाराच्या कारमध्ये इव्हीएम मिळाल्याच्या घटनेचाही उल्लेख केला.
LIVE: My interaction with Ambassador Nicholas Burns from Harvard Kennedy School. https://t.co/KZUkRnLlDg
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 2, 2021
काँग्रेसला निवडणुकीच्या राजकारणात सातत्याने येत असलेल्या अपयशाबद्दल विचारले असता राहुल गांधी यांनी सांगितले की, आज आम्ही एका वेगळ्या स्थितीत आहोत. आमच्या कडील लोकशाही प्रणालीतील स्वतंत्र संस्था आमचे रक्षण करत नाहीत. लोकशाही प्रणालीत विरोधकांना या संस्थांनी राजकारण न करता निष्पक्षपणे काम करावे असेही ते म्हणाले.